
Online Shopping Rules 2027: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जर तुम्हालाही ऑनलाईन शॉपिंग करायची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जवळच्या बाजारात जाण्यापेक्षा मोबाईलवरूनच खरेदी करणं तुम्हाला आवडत असेल तर ही माहिती नक्की वाचा. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा दुसऱ्या कुठल्या अॅपवरून नेहमी खरेदी करत असाल तर आता शॉपिंगच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. मेगा सेलमध्ये 50 ते 80 टक्के सूट दाखवली जाते, पण खरंच किंमत कमी झालीय का, हे आपल्याला कळत नाही. Online Shopping Rules 2027:
अनेकदा वेबसाईटवर जास्त शुल्क लावलं जातं आणि मोठ्या ऑफर दाखवून लोकांना घाईघाईने खरेदी करायला लावलं जातं. आता या गोंधळाला आळा घालायला सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांसाठी नियम बदललेत.2020 मध्ये बदल करून नवे नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होतील. या नियमानुसार कंपन्यांना सवलतीसोबत गेल्या 30 दिवसातली सगळ्यात कमी किंमत पण दाखवावी लागेल.
ऑनलाईन खरेदी करताना आपल्याला अनेकदा 60 किंवा 70 टक्के ऑफर दिसते. नव्या नियमानुसार कंपन्यांना आता जास्त पारदर्शकता ठेवावी लागेल. जर एखाद्या अॅपने वस्तूच्या किमतीत कपात केल्याचं सांगितलं, तर त्यांना नवी किंमत आणि जुनी किंमत दोन्ही दाखवणं बंधनकारक असेल. म्हणजे आधी 2000 ला होती आणि आता 999 ला आहे, हे खरं आहे की खोटं, हे लगेच कळेल.
Amazon India Investment: अॅमेझॉन भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रात ७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर काही शोधलं की वरती बरीच प्रॉडक्ट दिसतात. त्यातली काही प्रॉडक्ट ब्रँड किंवा विक्रेत्यांनी पैसे देऊन वर आणलेली असतात. आता या नियमात मोठा बदल होणार आहे. ग्राहकाला आता सामान्य रिझल्टमध्ये दिसणारी वस्तू आणि पैसे देऊन वर आणलेली वस्तू यातला फरक कळेल. म्हणजे तुम्ही फसणार नाही.
तुम्ही एखाद्या अॅपवर 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन शोधता. तुम्हाला त्या बजेटमधलाच आणि तुमच्या गरजेनुसार फोन दिसायला हवा. पण अनेकदा तसं होत नाही. नव्या नियमानुसार ई-कॉमर्स कंपन्या सर्च रिझल्टमध्ये किंवा शोध यादीत फेरफार करू शकणार नाहीत. तुम्ही जे शोधलंय, तेच दाखवावं लागेल.
ऑनलाईन वस्तू घेताना आपल्याला अनेकदा वस्तू कोण विकतंय, त्याची वॉरंटी किती आहे, किंवा वस्तू परत करायच्या अटी काय आहेत, हे माहित नसतं. नव्या नियमानुसार मार्केटप्लेसला ग्राहकांना ही सगळी माहिती देणं बंधनकारक असेल.
ऑनलाईन खरेदी करताना वस्तूच्या किमतीशिवाय दुसरं शुल्क लावलं जातं, जे आधी आपल्याला माहित नसतं. नव्या नियमानुसार ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांकडून कोणतंही जास्तीचं शुल्क घेऊ शकणार नाहीत. जे दाखवलंय तेच भरावं लागेल.
Ans: नवे ई-कॉमर्स नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार आहेत.
Ans: सवलतीची नवी किंमत आणि मागील 30 दिवसांतील सर्वात कमी किंमत दाखवावी लागेल.
Ans: पैसे देऊन वर दाखवलेली उत्पादने आणि सामान्य सर्च रिझल्ट यातील फरक स्पष्ट करावा लागेल.