युविका चौधरी ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून, ती सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे मॅटर्निटी फोटोशूट केले असून हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने व्हाईट-अँड-पेस्टल गार्डन थीमवर आधारित मॅटर्निटी फोटोशूटमध्ये तिचा बेबी बंप दाखवला होता. तिने दुसऱ्या लूकसाठी 60 च्या दशकातील सुंदरसा पोशाख परिधान केले आहे. अभिनेत्रींचे हे फोटो पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांनी तिच्या पोस्टवर कंमेंट करायला सुरुवात केली आहे.
युविका चौधरीचे पहा मॅटर्निटी फोटोशूट ग्लॅम लूकमध्ये अभिनेत्रीने फ्लॉन्ट केला बेबी बंप (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
बिग बॉस 9 च्या सेटवर भेटलेले आणि प्रेमात पडलेले युविका आणि प्रिन्स हे जोडपं आता लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. एका रिॲलिटी शोमधून सुरू झालेली त्यांची प्रेमकहाणी आता एका सुंदर लग्नात आणि कुटुंबातील नवीन सदस्याच्या अपेक्षेने फुलली आहे.
सहा वर्षांच्या वैवाहिक आनंदानंतर, युविका आणि प्रिन्सने या आनंदाच्या बातमीची घोषणा केली आणि चाहते खूप आनंदी झाले. अलीकडेच, युविकाने तिचे ग्लॅमरस मॅटर्निटी फोटोशूट शेअर करून चाहत्यांना चकित केले आहे.
अभिनेत्रीने पहिल्या लूकसाठी एक लांब ट्रेल जोडलेला पांढरा रंगाचा रेशमी गाऊन परिधान केला होता आणि या ड्रेसमध्ये ती सुंदर पोझ देत युविका तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली.
युविकाने मऊ लहरींमध्ये तिचे कपडे मोकळे ठेवले आणि पांढऱ्या ड्रेस मध्ये ती खूप आकर्षित दिसत होती. तसेच आजूबाजूला पेस्टल-गार्डन थीमची सजावट होती आणि युविकाच्या सौंदर्याने ही थीम परिपूर्ण दिसत होती.
युविकाने दुसऱ्या लूकसाठी चांदीच्या छटा असलेल्या न्यूड रंगाचा ड्रेस घातला होता. हा ड्रेस एकदम ९० दशकातील थीम निर्माण करत होता. या दोन्ही ड्रेससह युविकाने अत्यंत साधा आणि ग्लॅमरस मेकअप केला होता. आणि तसेच तिच्या प्रेग्नेंसीमुळे चेहरा आणखी खुलला होता.