(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा अवस्थीवर 11.5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाची किती कमाई?
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, स्टेकनिकच्या अहवालानुसार, चित्रपटाने ब्लॉक बुकिंगसह २.३३ कोटी कमावले. तर मर्दानी ३ पहिल्या दिवशी ३ कोटींपर्यंत कमावेल अशी अपेक्षा आहे. तर, चित्रपट पहिल्या आठवड्याच्या शेवटी ११-१३ कोटी कमावेल असा अंदाज लावण्यात येत आहे. तसेच, मर्दानी ३ एकूण ६०-७० कोटी कमावेल. महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगाल यांनी सर्वाधिक ॲडव्हान्स बुकिंगमध्ये भरभरून कमाई केली आहे.
पहिल्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करू शकतो?
चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिसवरील अंदाज देखील प्रसिद्ध झाले आहेत. हिंदुस्तानच्या मते, व्यापार विश्लेषक सुमित कडेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार, “मर्दानी ३” पहिल्या दिवशी १.७५-२.७५ कोटी रुपयांची कमाई करू शकते. पहिल्या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ११-१३ कोटी रुपयांची कमाई करू शकतो. अहवालानुसार, चित्रपटाची एकूण कमाई ६०-७० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
बालकलाकार अवनी जोशीची “मर्दानी 3” मध्ये मध्यवर्ती भूमिका, अवनीने शेअर केला अनुवभव
याआधीच्या दोन भागांनी भरभरून चर्चा
अभिराज मीनावाला दिग्दर्शित “मर्दानी ३” चा ट्रेलर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवत आहे. २०१४ मध्ये मर्दानी प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या भागालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चाहते आता तिसऱ्या भागाच्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात राणी मुखर्जी आणि मल्लिका प्रसाद मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढे किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






