Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली; म्हणाले- “आमची तर थट्टा….”

चित्रपटावर न्यायाधीश आणि वकिलांची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर, बुधवारी (१७ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 17, 2025 | 05:11 PM
मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली (Photo Credit- X)

मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘जॉली LLB 3’ ला मोठा दिलासा
  • मुंबई हायकोर्टाने बंदीची याचिका फेटाळली
  • याचिकेत नेमका काय होता आरोप?

Jolly LLB 3: अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांचा ‘जॉली एलएलबी ३’ हा (Jolly LLB 3) कोर्टरूम ड्रामा चित्रपट टीझर प्रदर्शित झाल्यापासून कायदेशीर अडचणीत सापडला होता. या चित्रपटावर न्यायाधीश आणि वकिलांची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर, बुधवारी (१७ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.

याचिकेत नेमका काय होता आरोप?

‘असोसिएशन फॉर एडिंग जस्टिस’ या संघटनेने वकील चंद्रकांत गायकवाड यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. चित्रपट आणि त्यातील “भाई वकील है” या गाण्यावर कायदेशीर व्यवसायाची खिल्ली उडवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, चित्रपटात केवळ वकिलांचीच नव्हे, तर न्यायाधीशांचीही खिल्ली उडवण्यात आली आहे. एका दृश्यात न्यायाधीशांना “मामू” असे संबोधले असून, तो न्यायव्यवस्थेसाठी एक अपमानजनक शब्द असल्याचे म्हटले होते. याचिकाकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्याची आणि आक्षेपार्ह गाणे काढून टाकण्याची मागणी केली होती.

STORY | Don’t worry about us, says HC; dismisses plea against ‘Jolly LLB 3’ movie The Bombay High Court on Wednesday dismissed a plea against Akshay Kumar and Arshad Warsi’s courtroom drama “Jolly LLB 3” alleging mockery of judges and lawyers, noting the court was used to such… pic.twitter.com/CMQYCoCmLp — Press Trust of India (@PTI_News) September 17, 2025

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात जॉलीची एन्ट्री; अक्षय कुमार आणि अर्शदने स्पर्धकांचा घेतला क्लास

न्यायालयाने याचिका फेटाळली

या याचिकेची सुनावणी करताना, मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने समाधान व्यक्त केले. याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, “आमची काळजी करू नका. पहिल्या दिवसापासूनच आमची चेष्ठा केली जाते. या प्रकरणी, चित्रपट निर्मात्यांनी न्यायालयाला माहिती दिली की, चित्रपटाविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयातही अशीच एक याचिका दाखल करण्यात आली होती, जी फेटाळण्यात आली आहे. या मोठ्या दिलासानंतर, हा चित्रपट ठरल्याप्रमाणे १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दो Jolly. Double the drama. Sirf दो din mein! Book your tickets now: https://t.co/oY5QarpGWc | https://t.co/IHRaZlLqSb #JollyLLB3 in cinemas 19th September. #JollyLLB3ThisFriday #JollyVsJolly pic.twitter.com/jge71VoyfD — Star Studios (@starstudios_) September 17, 2025

‘जॉली एलएलबी ३’ मध्ये अक्षय आणि अर्शद पुन्हा एकत्र

‘जॉली एलएलबी’ या लोकप्रिय कोर्टरूम कॉमेडी चित्रपट फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात प्रेक्षकांना एक खास गोष्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात, पहिल्या भागात वकील ‘जॉली’ची भूमिका साकारणारा अर्शद वारसी आणि दुसऱ्या भागात हीच भूमिका साकारणारा अक्षय कुमार हे दोन्ही कलाकार आता समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे, हा चित्रपट सुरूवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Bombay high court rejects plea seeking ban on jolly llb 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • arshad warsi
  • Bollywood
  • Bollywood News
  • Entertainmnet
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

सलमान खान अडकला कायद्याच्या कचाट्यात, पोलिसांनी बजावली नोटीस; नेमकं काय प्रकरण?
1

सलमान खान अडकला कायद्याच्या कचाट्यात, पोलिसांनी बजावली नोटीस; नेमकं काय प्रकरण?

”पंडित जी खूप पैसे घेतात..”, पत्नी सुनीता आहुजाचे विधान गोविंदाला पडले भारी, अभिनेत्याने मागितली माफी
2

”पंडित जी खूप पैसे घेतात..”, पत्नी सुनीता आहुजाचे विधान गोविंदाला पडले भारी, अभिनेत्याने मागितली माफी

Bigg Boss 19: अमालने तान्या मित्तलचा केला पर्दाफाश, रडू लागली बॉस; ‘बिग बॉस’च्या घरात रंगला नवा टास्क
3

Bigg Boss 19: अमालने तान्या मित्तलचा केला पर्दाफाश, रडू लागली बॉस; ‘बिग बॉस’च्या घरात रंगला नवा टास्क

‘Ek Deewane Ki Deewaniyat’ ची क्रेझ अजून सुरुच; दुसऱ्या मंगळवारीही चित्रपटाची भरभरून कमाई
4

‘Ek Deewane Ki Deewaniyat’ ची क्रेझ अजून सुरुच; दुसऱ्या मंगळवारीही चित्रपटाची भरभरून कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.