‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात पहिला जाणारा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करत आहे. मात्र आता या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. त्यांचा हा आवडता कार्यक्रम आता त्यांचा निरोप घेणार आहे. आज या कार्यक्रमाचं शेवटचं शूटिंग पार पडणार आहे.
[read_also content=”पुन्हा एकदा ऑस्करमध्ये वाजलं नाटू नाटू, एसएस राजामौलींच्या आरआरआरला लॉस एंजेलिसमध्ये सन्मान! https://www.navarashtra.com/latest-news/rrr-actionscene-and-naatu-naatu-screened-on-oscar-stage-nrps-514615.html”]
चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम दहा वर्षापुर्वी म्हणजे 18 ऑगस्ट 2014 पासून सुरु झाला. तेव्हापासून हा कार्यक्रम महाराष्ट्रातील लोकांच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘चला हवा येऊ द्या’ने आपला वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. आता हा कार्यक्रम बंद होत असल्याने चाहते नाराज झाले आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम 10 वर्षांपूर्वी अर्थात 2014 मध्ये सुरू झाला. कार्यक्रमात होणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे हा कार्यक्रम नेहमीच लक्षवेधी राहिला. अनेक वाहिन्यांवर वेगवेगळे विनोदी कार्यक्रम आले असले तरी झी मराठीच्या (Zee Marathi) ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची जागा कोणाला घेता आली नाही. आता या कार्यक्रमाच्या शेवटच्या एपिसोडची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड शूट करताना कलाकारांना अश्रू अनावर होतीलच. पण दुसरीकडे चाहत्यांचेही डोळे पाणावतील. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड प्रेक्षकांना येत्या शुक्रवारी 15 मार्च 2024 रोजी पाहायला मिळणार आहे.