अभिनेत्री परिणीती चोप्राचं (Parineeti Chopra) नाव बॉलीवूडमधील बहु-प्रतिभावान स्टार्समध्ये घेतलं जातं. अभिनयासोबत गोड गळा लाभलेल्या परीने नुकतचं तिचा एका म्युजिकल कॅान्सर्टही आयोजीत केला होता. ज्याला मोठ्या प्रमाणावर फॅन्सचा प्रतिसाद लाभला. आता तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल एक मोठे अपडेट शेअर केले आहे. परिणीती चोप्राने खुलासा केला आहे की ती इम्तियाज अली (Imtiaz Ali) दिग्दर्शित आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) अभिनीत ‘चमकिला’ (Chamkila ) या तिच्या पुढील चित्रपटासाठी सुमारे 15 गाणी गाणार आहे. ‘चमकिला’ हा वादग्रस्त पंजाबी लोक गायक अमरसिंग चमकिला यांचा बायोपिक आहे, परिणीती त्याची पत्नी आणि सहकारी गायिका अमरजोत कौरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दिलजीत ‘चमकिला’च्या भूमिकेत दिसणार आहे.
[read_also content=”पूजा सावंतनं सिद्देश चव्हाणसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; पहिला फोटो आला समोर! https://www.navarashtra.com/movies/pooja-sawant-engaged-with-siddesh-chavan-first-photo-out-507807.html”]
याआधी परिणीतीने तिच्या ‘मेरी प्यारी बिंदू’ आणि ‘केसरी’ या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तिने सांगितले की, ‘चमकिला’ चित्रपटाला होकार देण्यामागील मुख्य कारण म्हणजे तिला तिची संगीत प्रतिभा दाखवण्याची मिळणारी संधी. परिणिती म्हणाली, ‘हा चित्रपट करण्यामागील एक मुख्य कारण म्हणजे मला त्यात जवळपास 15 गाणी गायला मिळत होती. या चित्रपटादरम्यान माझा सहकलाकार दिलजीतने मला गाताना ऐकले आणि मला लाइव्ह परफॉर्म करण्यास सांगितले. माझ्या आजूबाजूचे प्रत्येकजण मला स्टेजवर गाऊ शकतो हे सांगायचे.
‘चमकिला’ चित्रपटाचे संगीत एआर रहमानने दिले आहे, ज्याने इम्तियाज अलीच्या मागील ‘रॉकस्टार’, ‘हायवे’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटांनाही संगीत दिले आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. तसेच, टीझर रिलीज करताना नेटफ्लिक्सने कॅप्शन दिले होते, ‘जो नाव तुमच्या हृदयात आणि मनात वर्षानुवर्षे आहे ते आता तुमच्यासमोर आले आहे. पंजाबमधील कलाकार अमर सिंग चमकिला यांची कथा पहा, लवकरच फक्त नेटफ्लिक्सवर येत आहे.