‘आरआरआर’ (RRR) चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Natu- Natu Song) गाण्याने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. या गाण्यात प्रचंड एनर्जी आहे. या गाण्याला प्रेम रक्षित यांनी कोरियोग्राफ केलं आहे. त्यांनी शूटींगच्या काळात घडलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
‘नाटू-नाटू’ च्या कोरियोग्राफरचा आनंद
‘नाटू-नाटू’चे कोरियोग्राफर प्रेम रक्षित म्हणाले की, मी पूर्णपणे ब्लँक झालोय. मला झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. मला फक्त देवळात जाऊन देवाचे आभार मानायचे आहेत. मी राजामौली सरांचे आभार मानतो कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझा आत्मविश्वास वाढला आहे.
मी खूप गरीब कुटुंबातून आलो आहे. माझ्या आई-वडीलांमुळे मी या इंडस्ट्रीमध्ये आलो. जेव्हा मला पहिल्यांदा 2008 मध्ये मला पुरस्कार मिळाला होता. तेव्हा मी म्हणालो होतो की मी पुरस्कार घेण्यासाठी नाही तर आई-वडिलांकडे स्वत:ला स्वाधीन करण्यासाठी आलोय. माझ्या कामाला आज जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे, यापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी असू शकत नाही.
[read_also content=”शिंदे गट आणि भाजपात सारं काही आलबेल नाही, विधान परिषदेच्या नावांवरुन वाद; आता संजय गायकवाड म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/all-is-not-well-between-shinde-group-and-bjp-dispute-over-vidhan-parishad-names-now-sanjay-gaikwad-said-360991.html”]
गाणं कोरियोग्राफ करण्यासाठी लागले दोन महिने
प्रेम पुढे सांगतात की, मी हे गाणं एक आव्हान म्हणून स्वीकारलं. खरंतर, एका स्टारसोबत काम करणं सोपं असतं पण मी या गाण्यात दोन सुपरस्टारसोबत काम केलं आबे. दोन सुरपरस्टार्सची डान्सिंग स्टाईल आणि एनर्जी वापरून गाण्याची कोरियोग्राफी करणं एक आव्हान होतं.मला या गाण्याच्या कोरियोग्राफीसाठी दोन महिने लागले. तुम्हाला जाणवेल की ते दोघं जेव्हा चालतात तेव्हा त्यांच्या चालीतील समानता, पर्फेक्शन यावर खूप काम करण्यात आलं आहे. मी दोघांसाठी 110 मूव्स तयार केल्या होत्या. जेव्हा नर्व्हस वाटायचं तेव्हा राजामौली सर धीर द्याचेय
20 दिवसांमध्ये झालं गाण्याचं शूटींग
गाण्याच्या शूटींगविषयी ते सांगतात की. या गाण्याच्या शूटींगसाठी 20 दिवस लागले होते. तसेच 43 रीटेक्सनंतर शूटींग पूर्ण झालं.या 20 दिवसांमध्ये रिहर्सलसोबतच आम्ही गाण्याचं शूटींग पूर्ण केलं. कोरियोग्राफीसाठी 2 महिने लागले होते. जेव्हा राजामौली सर माझ्याकडे हे गाणं घेऊन आले तेव्हा मी घाबरलो होतो. दोन सुपरस्टार्सना एकाच वेळी नाचवणं सोपी गोष्ट नाही. माझ्यावर या गोष्टीचं प्रेशर होतं की दोन सुपरस्टार्सपैकी कुणीही एकमेकांपेक्षा कमी वाटायला नको. दोघांना इक्वल एनर्जीमध्या दाखवणं हे माझं ध्येय होतं.
शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही गाण्यात खूप बदल केले. माझ्यासाठी ती अग्नीपरिक्षा होती. सकाळी जेव्हा त्यांच्या सीन्सचं शूटिंग पूर्ण व्हायचं तेव्हा पॅकअपनंतर थोडी विश्रांती घेऊन ते 6 वाजता माझ्याकडे रिहर्सलला यायचे. रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही गाण्याची तयारी करायचो. गाण्याचं शूटींग युक्रेनमध्ये झालं आहे.