Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colours Marathi : ‘आई तुळजाभवानी’मध्ये उलगडणार षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष!

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत घेऊन येत आहे एक थरारक आणि भव्य दैवी प्रवास – जिथे षड्रिपु मत्सर रूपी उमा आणि तिच्या सोबत पाच षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष उलगडेल

  • By अमृता यादव
Updated On: Oct 20, 2025 | 01:17 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत घेऊन येत आहे एक थरारक आणि भव्य दैवी प्रवास ,जिथे षड्रिपु मत्सर रूपी उमा आणि तिच्या सोबत पाच षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष उलगडेल. ही मालिका कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. मराठी टेलिव्हिजनवर अप्रतिम ग्राफिक्सचा कथानक सादर करण्यासाठी चपखल वापर करून प्रेक्षकांना नेत्रसुखद दृश्य अनुभव देणारी ही आजवरची एकमेव मालिका ठरली असून, त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मालिकेच्या याच अद्भुत ग्राफिक्स वैशिष्ट्याचा महा-आविष्कार या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. एका पर्वतकड्यावर उभ्या षड्रिपु मत्सर रूपी उमा. तिच्या मागे मोठ्या रूपातील मत्सर, तर बाजूला पाच षड्रिपु. एकाक्षणात हे सगळे रिपू उमामध्ये एकत्र होतात, आणि उमा प्रचंड महाकाय, महारिपूचे रूप धारण करते.

समांतर दृश्यात जगदंबा दिसते, तिच्या पाठीमागे विजेच्या कल्लोळात आई तुळजाभवानी प्रकट होते. जगदंबेच्या मस्तकावर उभा डोळा उघडतो, आणि त्यातून दैवी किरण बाहेर पडतात. ते किरण सहा रिपूंना स्पर्श करून त्यांना हवेत विरघळवतात आणि लालसर-केशरी, जळत्या षटकोणात रिपूंचे रुपांतर होते.त्या षटकोणाकडे रोखून पाहणाऱ्या जगदंबा आणि तुळजाभवानी, आणि त्यांच्या समोर षड्रिपु मत्सर रूपी उमा – षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा अद्भुत महासामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दिवाळी २०२५: घरबसल्या कुटुंबासोबत पाहा ५ धमाल बॉलिवूड चित्रपट!

‘आई तुळजाभवानी’ ही कलर्स मराठीवरील एक भव्य पौराणिक मालिका आहे जी महाराष्ट्रातील आदिशक्ती तुळजाभवानी देवीच्या गाथेवर आधारित आहे. या मालिकेत देवीच्या अद्भुत शक्ती, तिचा दैवी प्रवास आणि षड्रिपुंसारख्या दुष्ट शक्तींशी झालेला महासंघर्ष याचं अप्रतिम चित्रण करण्यात आलं आहे. मालिकेची मुख्य भूमिका अभिनेत्री पूजा काळे साकारत असून, त्यांच्या अभिनयातून देवी तुळजाभवानीचं सामर्थ्य, करुणा आणि तेज प्रभावीपणे सादर केलं जातं.

कलर्स मराठीवर अद्भुत स्वामी लीलांचा प्रवास; सुरु होणार श्री क्षेत्र अक्कलकोट महात्म्य ‘आदेश स्वामींचा – योग अक्कलकोट दर्शनाचा’

ही मालिका मराठी टेलिव्हिजनसाठी एक नवा टप्पा मानली जाते कारण यात उच्च दर्जाचे व्हिज्युअल ग्राफिक्स, भव्य सेट्स आणि दमदार कथानकाचा सुंदर संगम दिसतो. ‘मत्सर’ आणि इतर पाच षड्रिपु विरुद्ध तुळजाभवानीचा संघर्ष, जगदंबेचं प्रकट होणं आणि दैवी तेजाचं दर्शन या मालिकेचं वैशिष्ट्य ठरतं. भक्ती, शक्ती, आणि नारी सामर्थ्य यांचा उत्सव साजरा करणारी ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

Web Title: Colours marathi serial aai tuljabhavani will witness the battle of divine powers against shadripu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • colors marathi
  • Entertainemnt News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

दत्त जयंती विशेष भागाच्या निमित्ताने अक्षय मुडावदकर यांनी अक्कलकोटला घेतले स्वामींचे दर्शन!
1

दत्त जयंती विशेष भागाच्या निमित्ताने अक्षय मुडावदकर यांनी अक्कलकोटला घेतले स्वामींचे दर्शन!

Veen Doghatli Hi Tutena: समरच्या आरोग्यासाठी स्वानंदीने घेतला योग आणि प्राणायाम शिकवण्याचा निर्णय
2

Veen Doghatli Hi Tutena: समरच्या आरोग्यासाठी स्वानंदीने घेतला योग आणि प्राणायाम शिकवण्याचा निर्णय

टीव्ही अभिनेत्रीने एका वर्षानंतर दाखवला आपल्या जुळ्या मुलांचा चेहरा, फोटो पोस्ट करत म्हणाली…
3

टीव्ही अभिनेत्रीने एका वर्षानंतर दाखवला आपल्या जुळ्या मुलांचा चेहरा, फोटो पोस्ट करत म्हणाली…

‘इंद्रायणी’ मालिकेत नवा ट्विस्ट; श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात? इंद्रायणीच्या वाढणार अडचणी
4

‘इंद्रायणी’ मालिकेत नवा ट्विस्ट; श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात? इंद्रायणीच्या वाढणार अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.