Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी सान्वी मालूला दिल्ली पोलिसांची नोटीस, पती विकासकडून हत्या झाल्याचा केला होता आरोप

विकासने सतीश कौशिककडून 15 कोटी रुपये उसने घेतले होते. कोरोना काळामध्ये पैशाचं नुकसान झाल्यामुळे सतीश यांचे 15 कोटी परत करण्याचा विकास यांचा कोणताच उद्देश नव्हता. सतीश यांची हत्या करण्यासाठी ब्ल्यू पील्स (व्हायग्रा) व रशियन मुलींचा वापर करणार असल्याचंही विकास यांनी मला सांगितलं होतं, असा दावा सान्वीने केला.

  • By साधना
Updated On: Mar 13, 2023 | 04:38 PM
satish kaushik and swati malu

satish kaushik and swati malu

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Death) यांचं 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, ज्या होळी पार्टीत हजेरी लावल्यानंतर सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं, त्या फार्म हाऊसच्या मालकावर त्याच्याच पत्नीने आरोप केले होते. फार्म हाऊसचा मालक विकास मालूने (Vikas Malu) सतीश कौशिक यांचा खून केल्याचा आरोप सान्वी मालू (Sanvi Malu)यांनी केला होता.

विकासने सतीश कौशिककडून 15 कोटी रुपये उसने घेतले होते. कोरोना काळामध्ये पैशाचं नुकसान झाल्यामुळे सतीश यांचे 15 कोटी परत करण्याचा विकास यांचा कोणताच उद्देश नव्हता. सतीश यांची हत्या करण्यासाठी ब्ल्यू पील्स (व्हायग्रा) व रशियन मुलींचा वापर करणार असल्याचंही विकास यांनी मला सांगितलं होतं, असा दावा सान्वीने केला. विकासनेच सतीश कौशिक यांची हत्या केल्याचा आरोप सान्वीने केला होता. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी सान्वीला नोटीस पाठवली आहे.

दिल्ली पोलीस सध्या अभिनेते सतीश कौशिक मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सतीश कौशिक यांचा मित्र विकास मालूची दुसरी पत्नी सान्वी हिला पुन्हा चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस पाठवली आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी सान्वीला चौकशीसाठी बोलावले आहे.

याआधी सान्वी मालूने पती विकासवर बलात्काराचे आरोप केले आहेत. मी आधी विकास मालूविरोधात तक्रार दिली होती. विकासने लग्नाआधी माझ्यावर बलात्कार केला. पुढे मग बळजबरीने माझ्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्याचा मुलगाही माझा बलात्कार करू लागला. मला हे सगळं सहन होत नव्हतं, त्यामुळे ऑक्टोबर 2022 मध्ये मी त्याचं घर सोडलं, असं सान्वी मालूने सांगितलं.

दरम्यान, विकास मालू आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा अल्पवयीन मुलगा दोघांनीही सान्वीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. सान्वी व विकास यांच्या एकमेकांवरील तक्रारी पोलिसांनी नोंदवून घेतल्या आहेत. पण या प्रकरणात अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. आता या प्रकरणात नक्की काय बाहेर येणार हा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे.

Web Title: Delhi police issued notice to sanvi malu in satish kaushik death case nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2023 | 04:11 PM

Topics:  

  • entertainment
  • Satish Kaushik
  • Satish Kaushik Death

संबंधित बातम्या

‘मी चापलूसी नाही करत आणि…’, निक्की तांबोळीने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींना दिले उत्तर, काय आहे प्रकरण
1

‘मी चापलूसी नाही करत आणि…’, निक्की तांबोळीने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींना दिले उत्तर, काय आहे प्रकरण

‘घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, गणेशोत्सवात धमक्यात साजरा होणार!
2

‘घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, गणेशोत्सवात धमक्यात साजरा होणार!

Govinda- Sunita Ahuja: सुनीता आहुजाची घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल, गोविंदावर केले गंभीर आरोप
3

Govinda- Sunita Ahuja: सुनीता आहुजाची घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल, गोविंदावर केले गंभीर आरोप

‘बिग बॉस’ फेम सबा खान केले गुपचूप लग्न, कुटुंब आणि जवळचे मित्र सेलिब्रेशनमध्ये झाले सामील
4

‘बिग बॉस’ फेम सबा खान केले गुपचूप लग्न, कुटुंब आणि जवळचे मित्र सेलिब्रेशनमध्ये झाले सामील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.