मल्याळम चित्रपट ‘L2: Empuraan’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटाचे निर्माते गोकुळ गोपालन यांच्या विरोधात प्रवर्तन निदेशालय (ईडी)ने शुक्रवारी आणि शनिवारी श्री गोपालन चिट अँड फायनान्सेस कंपनी लिमिटेड आणि त्याचे अध्यक्ष गोकुळ गोपालन यांच्यासंबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान, एक हजार कोटी रुपयांच्या परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ च्या उलंघनाच्या प्रकरणात ईडीने सिनेनिर्मात्यांच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये ही छापेमारी केली आहे.
Ramayana: रामनवमीच्यानिमित्ताने चाहत्यांनी ‘रामायण’चे पोस्टर केले रिलीज, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा!
‘L2: Empuraan’चे निर्माते गोकुळ गोपालन यांच्याविरुद्ध ईडीने फार मोठी कारवाई केली आहे. ईडीने तामिळनाडू आणि केरळमधील गोपालन यांच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये छापे टाकले, ज्यामध्ये १,००० कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले. चित्रपट उद्योगापासून ते आर्थिक क्षेत्रापर्यंत खळबळ उडवून देणाऱ्या परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (FEMA) कथित उल्लंघनाशी संबंधित एका प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. ४ एप्रिल २०२५ रोजी ईडीने गोपालन यांच्या तामिळनाडू आणि केरळमधील अनेक ठिकाणी छापे टाकले आणि १,००० कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त केल्याचे वृत्त आहे. गोपालन यांच्या “गोकुलम चिट ग्रुप” या बिझनेस ग्रुपची चौकशी आणि निधीशी संबंधित अनियमित अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
जॅकलिनच्या आईचे मृत्यूचे कारण काय? किम फर्नांडिस लाइमलाइटपासून होत्या दूर!
सिनेनिर्मात्यांच्या वेगवेगळ्या कार्यालयांवर किंवा इतरत्र ठिकाणी कारवाई करण्याचे कारण म्हणजे, अनिवासी भारतीयांसोबत व्यवहारादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे आणि अनधिकृत देवाणघेवाण झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. शनिवारी (५ एप्रिल) ईडीने या छापेमारीत जप्त केलेल्या पैशांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याबरोबरच ईडीच्या अधिकृत अकाउंटवरून या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली आहे. “ईडीच्या कोची झोनल ऑफिसने ४ मार्च २०२५ आणि ५ मार्च २०२५ रोजी फेमा, १९९९ कायद्याअंतर्गत केरळमधील कोझिकोड येथील एका ठिकाणी आणि तमिळनाडूमधील चेन्नई येथील अशा दोन ठिकाणी श्री गोकुलम चिट्स अँड फायनान्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या निवासी आणि व्यावसायिक परिसरात शोध मोहीम राबवली. या छाप्यांमध्ये १.५० कोटी रुपये रोख आणि फेमा,१९९९ च्या उल्लंघनासंबंधी कागदपत्रे जप्त करण्यात आली,” असे ईडीने म्हटले आहे.
ED, Cochin Zonal Office has conducted search operations on 04.04.2025 and 05.04.2025 under the provisions of FEMA, 1999 at 1 location in Kozhikode, Kerala and in 2 locations in Chennai, Tamil Nadu at the residential and business premises of M/s Sree Gokulam Chits and Finance Co… pic.twitter.com/QfPrJAMJgz
— ED (@dir_ed) April 5, 2025
‘L2: Empuraan’ हा चित्रपट आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा छापा टाकण्यात आला. दरम्यान, २००२ च्या गुजरात दंगलींच्या चित्रपटातील चित्रणावरून वाद निर्माण झाला होता. या विरोधाला तोंड देत, निर्मात्यांनी चित्रपटातील २४ दृश्ये कापली आणि सेन्सॉर केलेली आवृत्ती पुन्हा प्रदर्शित केली. शिवाय मोहनलाल यांनी जाहीर माफीही मागितली. या आव्हानांना तोंड देत ‘L2: Empuraan’ने स्थानिक आणि जागतिक स्तरावर कामईचे अनेक विक्रम मोडले आहेत.
‘मला वेड लागलंय’ गाण्यावर रितेशचा मुलांसोबत अफलातून डान्स, Video पाहून जिनिलीया ही झाली अचंबित
ईडीने निर्मात्यांकडून सुमारे १,००० कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त केले आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA)च्या उल्लंघनाशी संबंधित एका प्रकरणात ही रक्कम जप्त करण्यात आली. तपासादरम्यान अनेक गुन्हेगारी कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे. जो आर्थिक अनियमितता आणि परदेशी व्यवहारांशी संबंधित असल्याचे आहे. गोपालनच्या “गोकुलम चिट ग्रुप” या व्यावसायिक गटाशी संबंधित रेकॉर्ड आणि पुरावे देखील जप्त करण्यात आले, जे तपासासाठी महत्त्वाचे मानले जातात. प्रवर्तन निदेशालयने (ईडी) टाकलेल्या छाप्यानंतर आता पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या कारवाईनंतर पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.