फोटो सौजन्य : सोशल मीडिया
नागा चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केले. अभिनेत्याचे वडील नागार्जुन यांनी दोघांचे फोटो शेअर करून ही माहिती दिली होती. यापूर्वी नागा चैतन्यने अभिनेत्री समंथा प्रभूसोबत लग्न केले होते. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. अशा परिस्थितीत आता नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेता नागार्जुन यांनी खुलासा केला आहे की, सामंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांचा मुलगा डिप्रेशनमध्ये गेला होता.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुनने समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितले. अभिनेता म्हणाला, ‘चाय किंवा कुटुंबासाठी ही वेळ खूप अवघड होती. समंथापासून वेगळ झाल्यानंतर तो नैराश्यात गेला. माझा मुलगा त्याच्या भावना कोणाला दाखवत नाही. पण तो आनंदी नव्हता हे मला माहीत होतं. त्याला पुन्हा हसताना पाहताना मलाही आनंद होत आहे. शोभिता आणि चाय हे एक अद्भुत जोडपे आहेत. ते एकमेकांवर खूप प्रेम करतात.
नागार्जुन समंथाला आपली मुलगी मानतात
नागार्जुनने सांगितले की, नागा चैतन्यपासून घटस्फोटानंतरही त्यांच्या आणि सामंथा रुथ प्रभूच्या नात्यात कोणताही बदल झालेला नाही. त्याने नेहमीच अभिनेत्रीला सूनेपेक्षा मुलगी म्हणून पाहिले आहे आणि ते हा बंध कायम ठेवू इच्छित आहेत.
लग्नाच्या चार वर्षानंतर समंथा चैतन्य वेगळे झाले
नागा चैतन्य आणि समंथा प्रभू यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांनी 2021 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर नागा चैतन्यचे नाव शोभिता धुलिपालासोबत जोडले जाऊ लागले आणि आता या जोडप्याने एंगेज करून सर्व अफवा खऱ्या केल्या आहेत.