(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन सध्या पॅरिस फॅशन वीक 2025 पूर्वी पॅरिसमध्ये दाखल झाल्या असून, त्यांच्या उपस्थितीने सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.आई-मुलीची जोडी अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत आली आहे. याच वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्येही आराध्याने आपल्या आईसोबत रेड कार्पेटवर हजेरी लावली होती, आणि ती तिच्या आत्मविश्वासामुळे विशेष चर्चेत राहिली होती.
यावेळी पॅरिसमध्ये ऐश्वर्याने स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात एन्ट्री केली, वाइड लेग ट्राउझर्स, पांढरा फॉर्मल शर्ट, आणि विशेष आकर्षण ठरलेला सोनसाखळ्यांनी सजलेला ब्लेझर हा ऐश्वर्याचा लूक सध्या सोशल मीडियावर झळकताना दिसत आहे. तर आराध्याचा लूक अधिक आरामदायक, तरीही आधुनिक आणि लक्षवेधी होता. बॅगी डेनिम जॅकेट, सुटसुटीत डेनिम जीन्स, आणि त्याखाली पांढऱ्या-हिरव्या रंगाचा टॉप. तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओज आणि फोटोज व्हायरल होत आहेत. मात्र त्यातील एक व्हिडीओ विशेष लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये एक महिला चाहती ऐश्वर्याला पाहून भावूक होऊन रडायला लागते.
कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस
पॅरिस फॅशन वीक 2025मध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालेल्या ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या या कृतीमुळे पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती केवळ सौंदर्यवती नाही, तर मनानेही खूप मोठी आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ क्लिपमध्ये, ऐश्वर्याला भेटून एक महिला चाहती अतिशय भावूक होऊन रडायला लागते. त्या अनपेक्षित आणि ओढ लावणाऱ्या क्षणात, ऐश्वर्याने अत्यंत आपुलकीने तिला मिठी मारली, शांत केलं, आणि तिच्या डोळ्यांतील अश्रू देखील स्वतःच्या हाताने पुसले. त्यानंतर तिने त्या चाहतीसोबत हसत फोटोसुद्धा काढला.
“जिंकणार म्हणजे जिंकणार”, भारताचा थरारक विजय; खेर यांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचा विवाह 2007 साली झाला होता आणि 2011 मध्ये आराध्याचा जन्म झाला. हे तिघंही वेळोवेळी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत असतात आणि त्यांच्या प्रत्येक हजेरीकडे प्रसारमाध्यमांचं आणि चाहत्यांचं लक्ष असतं.