Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा…’; ‘वामा’ चित्रपटातलं आयटम साँग प्रदर्शित

‘वामा - लढाई सन्मानाची’ या आगामी मराठी चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले.

  • By चेतन बोडके
Updated On: May 09, 2025 | 05:23 PM
गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा…’; ‘वामा’ चित्रपटातलं आयटम साँग प्रदर्शित

गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा…’; ‘वामा’ चित्रपटातलं आयटम साँग प्रदर्शित

Follow Us
Close
Follow Us:

‘वामा – लढाई सन्मानाची’ या आगामी मराठी चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. या गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात आपल्या ठसकेबाज अदांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गाण्यातील तिच्या ठसकेबाज नखऱ्याने सोशल मीडियावर आग लावली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

एका घटस्फोटाची गोष्ट, २३ मेपासून मोठ्या पडद्यावर; ‘मंगलाष्टका रिटर्न्स’चा अफलातून ट्रेलर रिलीज

गौतमी पाटीलचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज व सुचिर कुलकर्णी यांचे कमाल संगीत प्रेक्षकांना थिरकायला लावत आहे. गाण्याचे बोल तरंग वैद्य यांचे आहेत. आकर्षक सादरीकरण आणि उत्साही संगीताने हे गाणे सध्या सर्वत्र हिट ठरत आहे.

‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची कथा स्त्री सन्मान, आत्मगौरव आणि संघर्ष याभोवती फिरणारी असून, त्यात नायिकेची सशक्त लढाई मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल. तसेच चित्रपटात डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.

 

दिग्दर्शक अशोक कोंडके म्हणातात, “महिला सशक्तीकरणावर भाष्य करणारा हा चित्रपट असला तरी हा गंभीर चित्रपट नाही. यात मनोरंजनही आहे. हे आयटम साँग ही कथेची गरज होती आणि या नृत्यासाठी गौतमी पाटीलाशिवाय कोणीही पर्याय असूच शकत नाही. या गाण्याचे उज्जैनमध्ये ४ डिग्री सेल्सिअसमध्ये चित्रीकरण झाले. गौतमीने एवढ्या थंडीत, अगदी काही तासांत नृत्याचा सराव करत इतके बहारदार नृत्य सादर केले. यातून तिचे कामाप्रती असलेले प्रेम आणि व्यावसायिकता दिसते. गौतमीची अदाकारी, वैशाली सामंत यांचा ठसकेदार आवाज, गाण्याचे बोल आणि संगीत या सगळ्यानेच हे गाणे कमाल बनले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे सध्या गाजतेय, याचा आनंद आहे.”

“…मी गे नाहीये”, प्रतीक पाटीलने समलैंगिक असण्याच्या चर्चांवर सोडलं मौन

निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात, “हे गाणे चित्रपटात एक वेगळीच रंगत आणणारे आहे. गाण्याची टीमही जबरदस्त असल्याने या गाण्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. ”

ओंकारेश्वरा प्रस्तुत व सुब्रमण्यम के. निर्मित ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले आहे.

Web Title: Famous dancer gautami patil vaama ladhaai sanmanachi marathi movie fire brigadela bolva marathi song released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • Gautami patil
  • marathi movie
  • viral Song

संबंधित बातम्या

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
1

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
2

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत
3

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा
4

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.