Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मराठीचा मक्ता घेण्यापेक्षा मराठीची पताका घेणं गरजेचं…” लेखक क्षितीज पटवर्धनचं मराठी भाषेवरील वक्तव्य चर्चेत

'आज्जीबाई जोरात' नाटकाचा नुकताच १०० वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थिती लावली होती. याचेच औचित्य साधत लेखक- दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 21, 2025 | 08:19 PM
"मराठीचा मक्ता घेण्यापेक्षा मराठीची पताका घेणं गरजेचं..." लेखक क्षितीज पटवर्धनचं मराठी भाषेवरील वक्तव्य चर्चेत

"मराठीचा मक्ता घेण्यापेक्षा मराठीची पताका घेणं गरजेचं..." लेखक क्षितीज पटवर्धनचं मराठी भाषेवरील वक्तव्य चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

आजचे प्रत्येक वयोगटातले मुलं तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे मोबाईलमध्ये गुरफटून राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषेवर आणि सामान्य जीवनातील हावभावावर फार बदल होताना दिसत आहे. लहान मुलांच्या हावभावावर आणि त्यांच्या सामान्य जीवनातील इतर गोष्टींवर प्रकाश टाकणारं एक नाटक म्हणजे, ‘आज्जीबाई जोरात’… क्षितीज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित  ‘आज्जीबाई जोरात’ नाटकाचा नुकताच १०० वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी खास उपस्थिती लावली होती. याचेच औचित्य साधत लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. दिग्दर्शकानं शेअर केलेल्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

लॉरेन्स बिश्नाई गँगकडून रुबिना दिलैकच्या पतीला जीवे मारण्याची धमकी, नेमकं प्रकरण काय ?

‘आज्जीबाई जोरात’ नाटकाच्या १०० व्या प्रयोगाच्या खास क्षणाचे फोटो शेअर करत क्षितिज पटवर्धनने कॅप्शन देत लिहिलंय की, “काल (२० एप्रिल) सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी १००व्या प्रयोगाला येऊन आमचा फक्त उत्साहच वाढवला नाही तर मराठी पुढच्या पिढीत रुजवण्यासाठी आणि मुलामधलं स्क्रीन ॲडिक्शन कमी करण्यासाठी नाटकाला सहकार्य करण्याची खात्री सुद्धा दिली. त्यांचे खरोखर मनःपूर्वक आभार. कालचा प्रतिसाद अक्षरशः अविस्मरणीय होता. मराठी आतून बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही गेले वर्षभर करत आहोत. नव्या पिढीत आजवर जवळपास २५००० मुलांना मराठी भाषेची गंमत, बोलीभाषांचं महत्व, मराठी संस्कृती, साहित्य परंपरा या सगळ्याबद्दल भव्य दिव्य पद्धतीने मांडलं आहे, पुढेही मांडू! बाहेरच्यांशी मराठीवरून भांडण्यापेक्षा आपल्या आत मराठी रुजवणं जास्त गरजेचं आहे असं वाटतं. त्यासाठी मराठी कला, साहित्य, सिनेमा, नाटक यांचा चांगला अनुभव देणं ही बनवणाऱ्यांची आणि घेणं हे रसिकांची जबाबदारी आहे. त्यानेच व्यवसाय, संस्कृती आणि पर्यायाने भाषा सुद्धा जिवंत राहील! मराठीचा मक्ता घेण्यापेक्षा मराठीची पताका घेणं गरजेचं आहे जी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत देता येईल! काल जितेंद्र जोशी या जिवलग मित्राच्या सांगण्यावरून “आज्जीबाई जोरात! म… मराठीचा!” अशी टॅग लाईन करतो आहोत. तुम्हाला कशी वाटतेय नक्की सांगा.”

 

एलॉन मस्क यांच्या आई माय मस्कने जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो

दिग्दर्शक आणि लेखक क्षितिज पटवर्धनने “आज्जीबाई जोरात” नाटकासाठी लिहिलेली ही खास पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक सध्या रंगभूमीवर कमालीचं चर्चेत नाटक आहे. या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात हाऊसफुल्ल शो होताना पाहायला मिळत आहे. या पहिल्या एआय महाबालनाट्याला रसिक मायबाप प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकामध्ये मुख्य भूमिकेत अभिजीत केळकर, पुष्कर श्रोत्री, अभिनय बेर्डे, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले आणि निर्मिती सावंत आहेत. ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने १०० प्रयोगांचा टप्पा काल म्हणजेच २० एप्रिलला पार पडला. 

Web Title: Famous marathi writer and director kshitij patwardhan shared marathi language regarding post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 08:19 PM

Topics:  

  • Film Director
  • marathi film
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
1

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
2

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
3

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

पहिल्यांदाच पथनाट्य सादर करीत अनोख्या पद्धतीने ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
4

पहिल्यांदाच पथनाट्य सादर करीत अनोख्या पद्धतीने ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.