Jacqueline Fernandez With Elon Musk Mother Maye Musk Visits Siddhivinayak Temple
प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क (Buisnessman Elon Musk) हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपनीचे मालक आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील एक नाव म्हणजे, एलॉन मस्क… गेल्या काही दिवसांपासून एलॉन मस्क ‘टॅरिफ वॉर’मुळे चर्चेत आहेत. अवघ्या जगाला ‘टॅरिफ वॉर’मध्ये ढकलणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिशी सुप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क उभे आहेत. एलॉन मस्क यांच्या आई माये मस्क सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ७७ वर्षीय माये मस्क सध्या मुंबईमध्ये आहेत. त्यांनी आता मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. त्यांच्यासोबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सुद्धा स्पॉट झालीये.
७७ वर्षीय माये मस्क गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतच मुक्कामी आहेत. यावेळी त्यांनी त्यांचा वाढदिवसही मुंबईमध्ये सेलिब्रेट केला. आज (सोमवार- २१ एप्रिल २०२५) माये मस्क या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे फोटो व्हायरल झाले असून त्यांच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील दिसत आहे. ‘इंडियन सेलिब्रिटीज्’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हे फोटोज् शेअर करण्यात आले आहेत. माये मस्क आणि जॅकलिन यांनी काल म्हणजेच ईस्टर संडेच्या दिवशी दर्शन घेतला आहे. त्याच दरम्यानचे दर्शन घेतानाचे फोटो आता समोर आले आहेत. काही वेळापासूनच सोशल मीडियावर मंदिरातील दर्शन घेतानाचे फोटोज् व्हायरल होत आहेत.
जॅकलिन आणि मेय मस्क यांचे मंदिरात पूजा करताना आणि मंदिराच्या पुजाऱ्याकडून आशीर्वाद घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जॅकलिन फर्नांडिस सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनाकरिता सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तर इलॉन मस्क यांच्या आई माये मस्क या सुद्धा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसल्या. मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर जॅकलीनने हिंदुस्थान टाईम्सला मुलाखत दिली. मुलाखतीत जॅकलिन म्हणाली, “माये यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेणं हा खूप सुंदर अनुभव होता. माये त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भारतात आल्या आहेत. माये यांच्या पुस्तकातून एका महिलेचा लढा तुम्हाला पाहायला मिळेल. विशेषतः वय हा फक्त एक आकडा असून त्यावरून तुमच्या स्वप्नांचा किंवा ध्येयाचा अंदाज येऊ शकत नाही.”