Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“फोन करून माझी बायको मला म्हणते…”, प्रसिद्ध अभिनेत्याची परदेशात असलेल्या पत्नीसाठी भावूक पोस्ट

कुशल पत्नी सुनयनासोबत अनेक फोटो- व्हिडिओ शेअर करत असतो. त्याने पत्नीसोबतचे फोटोज् शेअर करत मजेशीर कॅप्शन देत स्पेशल पोस्ट शेअर केलीये. अभिनेत्याच्या पोस्टच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 07, 2025 | 05:46 PM
"फोन करून माझी बायको मला म्हणते...", प्रसिद्ध अभिनेत्याची परदेशात असलेल्या पत्नीसाठी भावूक पोस्ट

"फोन करून माझी बायको मला म्हणते...", प्रसिद्ध अभिनेत्याची परदेशात असलेल्या पत्नीसाठी भावूक पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि अफलातून कॉमेडीच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके चर्चेत राहिलेला आहे. कुशल बद्रिकेने आपल्या निखळ कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवत आणि त्यांचं मनोरंजन करत आपल्या अभिनय कौशल्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कुशल कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेता चाहत्यांसोबत त्याच्या आयुष्यातील अनेक गंमतीजमती शेअर करत असतो. चाहते त्याच्या पोस्टचं कौतुक देखील करतात. अभिनेत्याने त्याच्या पत्नीबद्दल खास पोस्ट शेअर केलेली आहे. कुशल पत्नी सुनयनासोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. अशातच त्याने सुनयनाचे काही फोटोज् शेअर करत त्याखाली मजेशीर कॅप्शन देत स्पेशल पोस्ट शेअर केलीये. त्याच्या पोस्टच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले असून चाहते त्याच्या पोस्टचे कौतुक करीत आहेत.

दीपिका पादुकोणने ‘स्पिरिट’च्या दिग्दर्शकाकडे कोणकोणत्या मागण्या केलेल्या ? संदीप वांगासोबतच्या वादाचं नेमकं कारण समोर

परदेशामध्ये असलेल्या पत्नीसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना कुशल बद्रिकेने लिहिले की, “अचानक एक दिवस फोन करून माझी बायको मला म्हणते, ह्या देशात लोक खूप भावूक आहेत. आम्हाला इथे प्रभू श्रीराम आणि “माता सीता” म्हणून लोकांनी आमची पूजा केली. जवळजवळ गेला महिनाभर, माझी बायको तिच्या कथ्थकच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशात (Trinidad and Tobago मध्ये) आहे. त्यात ती “सीता मातेची” भूमिका करते. मी तिला म्हणालो की, अगं, ती सीता “प्रभू रामां”सोबत किती तरी वर्ष जंगलात चालत राहिली. आपण डोंबिवलीला असताना, मी “तुला” २– ३ वेळा डोंबिवली स्टेशन ते घर चालत नेलं होतं, तर आजसुद्धा भांडणात तो मुद्दा घेऊन येतेस आणि “माता सीता” म्हणून तुम्हाला पूजल्याचं कौतुक मला सांगतेस…! त्या नंतर फोनवरच आमच्यात थोडंसं रामायण घडलं. अर्थात, माझा पराभव झाला. माता सीतेपुढे दशानन रावण हरला, तिथे आपली काय बिशाद! असो, पण आता ये घरी परत… खऱ्या आयुष्यात आपण “राम-सीता” नसलो तरी “तू” सोबत नसताना आयुष्य म्हणजे वनवासच गं !!– सुकून”

 

Web Title: Famous television actor kushal badrike shared post for his wife on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • kushal badrike
  • marathi actor
  • Television Shows

संबंधित बातम्या

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
1

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर
2

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर

‘राइज अँड फॉल’मधील दोस्तीचं नातं! पवन सिंगची इच्छा धनश्री वर्माने पूर्ण केली, लाल ड्रेसमधील लूक होतोय व्हायरल
3

‘राइज अँड फॉल’मधील दोस्तीचं नातं! पवन सिंगची इच्छा धनश्री वर्माने पूर्ण केली, लाल ड्रेसमधील लूक होतोय व्हायरल

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
4

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.