Reason Behind Dispute Between Deepika Padukone Sandeep Reddy Vanga
रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा सध्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘स्पिरिट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या आगामी ‘स्पिरीट’ चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोणने एक्झिट घेतली. दीपिकाच्या एक्झिटनंतर चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरीची एण्ट्री झाली. तृप्तीने याआधी संदीपच्या ‘ॲनिमल’मध्ये काम केलं होतं. ‘स्पिरीट’नंतर दीपिका प्रभासच्या ‘कल्की’ चित्रपटातून बाहेर पडल्याची चर्चा आहे.
Housefull 5 ची छप्परफाड कमाई, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
सेटवर दिवसाला ८ तासांची शिफ्ट करण्यासह अनेक अटी दीपिकाने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यासमोर ठेवल्या होत्या. त्या अटी दिग्दर्शकांनी अमान्य केल्या होत्या. त्यानंतर दीपिकाने चित्रपट सोडला. दरम्यान, अशातच सध्या सोशल मीडियावर दीपिकाने दिग्दर्शकांकडे फक्त ८ तासांचीच शिफ्ट नाही तर, २५ कोटी रुपये मानधन आणि १० टक्के नफ्याचा वाटा मागितल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ‘न्यूज१८’ दिलेल्या एका वृत्तानुसार, ‘स्पिरिट’च्या निर्मात्यांनी तिला चित्रपटातून का वगळले आणि तिच्या जागी तृप्ती डिमरीला का घेतले हे उघड झाले आहे. दीपिका पदुकोणच्या टीमशी संपर्क साधला होता, परंतु ही बातमी प्रकाशित होईपर्यंत त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.
दीपिकावर झाली १४ तास शस्त्रक्रिया, पती शोएबने दिली हेल्थ अपडेट; म्हणाला, “लिव्हरचा भाग कापून…”
‘न्यूज१८’ च्या रिपोर्टमध्ये असा खुलासा करण्यात आला आहे की, “सत्य अगदी वेगळे आहे. चित्रपटातून बाहेर पडण्यामागील खरे कारण खूपच वेगळं आहे. दीपिकाने ३५ दिवसांच्या शूटिंगसाठी २५ कोटी रुपये मागितले. याशिवाय नफ्याचा १०% वाटाही मागितला होता. तसंच तिने तेलुगूमध्ये संवाद न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्याचबरोबर ‘स्पिरिट’ची कथा लीक झाली. अपेक्षा बाजूला ठेवून, ८ तासांच्या शूटिंगचा मुद्दाही नव्हता. चित्रपट निर्मितीमध्ये, कामाचे तास वेगवेगळे असतात आणि ते लोकेशन, लाईट्स आणि अनेक तांत्रिक गोष्टींवर अवलंबून असतात. दृश्यानुसार तुम्ही २ तास किंवा ८ तास शूटिंग करू शकता.”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “दक्षिणेकडील कलाकारांनी स्वतःचे संवाद बोलण्यासाठी हिंदी शिकले आहे. संदीप रेड्डी वांगा यांचा असा विश्वास आहे की, कलाकार स्वतःचे संवाद बोलल्याने प्रेक्षकांशी भावनिक संबंध निर्माण होतो. बरेच लोक वस्तुस्थिती जाणून घेतल्याशिवाय आणि निर्मिता-दिग्दर्शकाला कोणते परिणाम भोगावे लागतील हे समजून न घेता भाष्य करत आहेत, जे दिशाभूल करणारे आणि चुकीचे आहेत.”