Deepika Padukone Announce Her New Movie AA22xA6 With Allu Arjun And Atlee To Direct
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून ‘स्पिरिट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने दिग्दर्शकांकडे आठ तासांच्या शिफ्टसह अनेक गोष्टींच्या मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या केल्यामुळे दीपिकाला दिग्दर्शकांनी ‘स्पिरिट’ चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. स्पिरिटनंतर दीपिकाने कल्की २मधूनही एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. आता दीपिकाची साऊथ दिग्दर्शक ॲटली कुमारच्या सिनेमात एन्ट्री झाली आहे. या चित्रपटाचा अनाऊंसमेंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काही तासांपूर्वीच ‘सन पिक्चर्स’ने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर हा अभिनेत्रीचा अनाऊंसमेंटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ॲटली दिग्दर्शित चित्रपटाचं नाव AA22xA6 असं असून प्रमुख भूमिकेत अल्लू अर्जुनसोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील आहे. ॲटली कुमारच्या चित्रपटामध्ये दीपिकाची एन्ट्री झाल्याची स्पेशल व्हिडिओ निर्मात्यांकडून शेअर करण्यात आली आहे. दीपिका अल्लू अर्जुनसोबत पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दीपिकाचा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दीपिका ॲक्शन सीन्स करताना दिसत आहे.
निर्मात्यांनी दीपिका पादुकोणच्या कास्टिंगची घोषणा करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दीपिका हातात भाला घेऊन फ्युचरिस्टिक सूट घालून ॲक्शन सीन्स करताना दिसत आहे. दीपिका, अल्लू अर्जुन आणि ॲटली यांचा AA22xA6 हा एक साय-फाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट असेल. या चित्रपटाचे शूटिंग या वर्षापासूनच सुरू होईल. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दीपिकाला अल्लू अर्जुनसोबत हा मोठा चित्रपट मिळाला आहे, तर दुसरीकडे, दीपिका ‘कल्की २’ देखील गमावणार असल्याची बातमी आहे.
Housefull 5 ची छप्परफाड कमाई, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने ‘स्पिरिट’साठी संदीप रेड्डी वांगा यांच्याकडून ८ तासांच्या कामाच्या शिफ्टची मागणी केली होती, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर चित्रपटात दीपिकाच्या जागी तृप्ती डिमरीला साइन करण्यात आले. हे पाहता, ‘कल्की २’ मधूनही दीपिकाला काढण्याची शक्यता आहे, अशी अद्याप सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. असे म्हटले जात आहे की, दीपिका ८ तासांच्या कामाच्या शिफ्टच्या अटीवर ठाम आहे आणि ही बाब निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. अशा परिस्थितीत नाग अश्विन ‘कल्की २’ मधून दीपिकाच्या ऐवजी इतर कोणत्या तरी अभिनेत्रीला चित्रपटात कास्ट करु शकतो.