(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कल्की २’ च्या चित्रीकरणाबद्दलची माहिती सोशल मीडियावर सतत समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकतेच ‘कल्की २’ चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. ‘कल्की २’ मध्ये दाक्षिणात्य आणखी एका अभिनेत्याच्या प्रवेशाची बातमी समोर आली आहे. जाणून घ्या, तो अभिनेता कोण आहे?
नुकतेच, अमिताभ बच्चन यांनी ‘कल्की २’ च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते त्यांच्या अश्वत्थामा या पात्राच्या लूकमध्ये दिसत असून, त्यांनी कमल हासन यांना मिठी मारल्याचेही दिसत आहे. या दोघांनी शेवटचे १९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘गिरफ्तार’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. ४० वर्षांनंतर पुन्हा कमलसोबत काम करण्याचा आनंद बिग बींनी व्यक्त केला.
१२३ तेलगूच्या वृत्तानुसार, दुल्कर सलमान आणि जेडी चक्रवर्ती हे देखील ‘कल्की २’ मध्ये दिसणार आहेत. दोघेही सध्या हैदराबादमध्ये ‘कल्की २’ चे चित्रीकरण करत आहेत. प्रभास नंतर चित्रीकरणात सामील होईल. निर्माते लवकरच ‘कल्की २’ बाबत अधिकृत घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.
‘कल्की २’ चे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. हा चित्रपट हिंदू धर्मग्रंथांपासून प्रेरित एक पौराणिक विज्ञान-कथा (सायन्स फिक्शन) चित्रपट आहे. पहिल्या भागात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने ‘कल्की’ सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात केली, जो इसवी सन २८९८ मधील काशी शहराची कथा सांगतो.
‘बकवास चित्रपट…’ म्हणत पाकिस्तानी कुटुंबाची ‘Dhurandhar 2′ वर टीका; भारतीय चाहत्यांचे सडेतोड प्रत्युत्तर
‘कल्की 2898’ मध्ये भगवान श्रीकृष्णाची झलक पाहायला मिळणार
‘कल्की 2898 एडी’ मध्ये, भगवान कृष्णाचे पात्र सावलीच्या रूपात दाखवण्यात आले होते आणि अभिनेता कृष्णकुमार बालसुब्रमण्यम यांनी ही भूमिका साकारली होती. या सर्जनशील निर्णयामुळे महेश बाबू आणि नानी यांसारखी नावं समोर आल्याने सिक्वेलमध्ये भूमिका साकारण्यासाठी संभाव्य अभिनेत्यांबद्दल अटकळ बांधली गेली.






