वॉचमनची नोकरी घेतले अभिनयाचे धडे, एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावा असा सयाजी शिंदे यांचा 'फेम' प्रवास
मराठी, बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेता सयाजी शिंदे आपल्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षक कायमच मोठ्या प्रमाणावर कौतुक करतात. सयाजी शिंदे यांनी साकारलेल्या एका व्हिलनची भूमिका ते एका राजकारण्याची भूमिका किंवा एका सभ्य माणसाची भूमिका ते त्याच ताकदीने साकारून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. कोणतीही भूमिका असो, अगदी लिलया साकारणारे सयाजी शिंदेंचा आज वाढदिवस आहे. त्यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे.
सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून गायक सलील कुलकर्णी भारावला, पोस्ट शेअर करत केले कलाकारांचे कौतुक
मराठी आणि तामिळ, तेलुगू इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेले सयाजी शिंदेंनी एकेकाळी वॉचमन म्हणून काम केलंय. सयाजी शिंदे यांचा जन्म १३ जानेवारी १९५९ रोजी सातारा जिल्ह्यातील वेळे-कामती नावाच्या एका छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला आहे. बालपणी छोट्याशा खेडेपाड्यात राहत असताना सयाजी यांना त्यांच्यात दडलेला अभिनेता स्वस्थ बसू देत नव्हता. सयाजी शिंदे यांनी आपल्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे गाव सोडलं आणि सातारा शहर गाठलं. सयाजी यांनी मराठी भाषेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागामध्ये ‘नाईट वॉचमन’ची नोकरी करत अभिनय करिअरची सुरूवात केली. तेव्हा सयाजी शिंदे यांचा १६५ रुपये प्रत्येक महिन्याला पगार घेत होते. त्यावेळी, सयाजी शिंदेंची साताऱ्यातील सुनील कुलकर्णी या रंगकर्मीशी गाठ पडली आणि खऱ्या अर्थाने सयाजी यांच्या फेम प्रवासाला सुरूवात झाली.
महाविद्यालय जीवनात हौशी नाटकं करता करता सयाजी शिंदे आज मराठीच नाही तर हिंदीसोबत दाक्षिणात्या सिनेसृष्टी देखील गाजवत आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावा असाच सयाजी शिंदे यांचा प्रवास आहे. सयाजी शिंदे यांनी १९७८ मध्ये मराठी एकांकिका स्पर्धेतून स्वत:ची ओळख करून दिली. हीच त्यांच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात म्हणावी लागेल. १९८७ मध्ये ‘झुल्वा’ नावाच्या मराठी नाटकातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हापासून त्यांना चाहत्यांनी भरभरून लोकप्रियता मिळवून दिली. सयाजी शिंदे यांनी नियमितपणे नाटकांमधून भूमिका करायला सुरूवात केली. पण आपल्याल्या अभिनयगुणांना अजून वाव मिळावा, या भावनेतून सयाजी यांनी मुंबई गाठली. मुंबईत अनेक थिएटर वर्कशॉप करत असतानाच अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले. थिएटर करत असतानाच त्याना अबोली हा चित्रपट मिळाला. अबोलीमधील त्यांची भूमिका प्रचंड गाजली.
सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील झाला. थिएटर आणि मराठी चित्रपट करत असतानाच सयाजी यांना पहिला हिंदी चित्रपट मिळाला. ‘शूल’ चित्रपटानंतर सयाजी शिंदे यांनी मागे वळून पाहिले नाही. सयाजी यांनी आज मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्येही त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘गोष्ट छोटी डोंगरा एवढी’ या चित्रपटात कृषीमंत्री म्हणून त्यांची भूमिका सर्वांच्या लक्षात राहाणारी आहे. चित्रपटांमधून सयाजी यांनी प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा आणि यश मोठ्या प्रमाणावर मिळाले असले तरीही आजही त्यांचे पाय गावच्या मातीत घट्ट रोवलेले आहेत. ते जरी शहरात राहात असले तरी गावाच्या मातीशी त्यांची नाळ तुटलेली नाही. सामाजिक बांधिलकीतून सयाजी यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सयाजी यांची धडपड सुरू आहे. २०१६ साली साताऱ्यात त्यांनी ‘प्रत्येक शाळेत नर्सरी’ असा उपक्रम त्यांनी हाती घेतला होता. सयाजी उद्यान या उपक्रमातून ते राज्यभरात वृक्षरोपण मोहिम राबवत आहेत. सयाजी शिंदे यांनी अलिकडेच सह्याद्री देवराई हा नवा उपक्रम सुरू केला आहे.
प्रसिद्ध संगीतकार गायक राहुल घोरपडे यांचं निधन; कला विश्वावर शोककळा