"योजनांना पैसे वाटप करताना दमछाक होते आणि गरजेच्या कामांना..." कुंडमळा दुर्घटनेप्रकरणी मराठमोळ्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा हे एक पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी दरआठवड्याला हजारो पर्यटक येत असतात. विशेष म्हणजे, सुट्टीच्या दिवशीही याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येतात. सुट्टीच्या दिवशी म्हणजेच, रविवारी १५ जून रोजी याठिकाणी एक मोठी दुर्घटना घडली. रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून काही पर्यटक वाहून गेले. या नदीच्या प्रवाहात तब्बल ३० ते ४० पर्यटक वाहून गेल्याचे वृत्त आहे. तर या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पुलावर जवळपास ५० च्या आसपास पर्यटक होते. त्यांच्या वजनामुळेच हा पुल पडल्याची चर्चा सुरु आहे, त्यासोबतच हा पुल देखील फार जुना होता.
या घटनेनंतर राजकीय नेत्यांसोबत आता सेलिब्रिटींकडूनही प्रतिक्रिया येत आहे. अशातच मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक- लेखक हेमंत ढोमेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने एक्सवर (ट्वीटर) ही विशेष पोस्ट शेअर केलेली आहे.
सर्जरीनंतर दीपिका कक्करने मुलगा रुहानसोबत घालवला वेळ, कठीण काळ आठवून झाली भावुक!
शेअर केलेल्या पोस्टमध्ये हेमंत ढोमेने लिहिले की, “इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून जी दुर्घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे… लोक वाहून गेलेत आणि संख्या आपल्याला माहीत नाहीये… पूल ५० वर्षे जुना होता, त्याची दुरुस्ती करणं गरजेचं होतं! सरकारने मंजुरी देऊनही काम सुरू झालं नाही! सरकारने जागं व्हावं!!! असे पूल आपल्याकडे अनेक ठिकाणी आहेत! त्याकडे लक्ष द्या! लाभार्थी योजनांना पैसे वाटप करताना दमछाक होते आणि काही गरजेच्या कामांना बाजूला ठेवलं जातं… त्याचं हे उत्तम उदाहरण! या घटनेत बेभान पर्यटकांचाही तितकाच दोष आहे, पावसाळ्यात काही ठिकाणांना भेट देताना काळजी घ्यायला हवी! एवढं बेभान वागणं बरं नाही… त्या रिल्सच्या नादात आपण किती बेजबाबदारपणे वागतो याचं थोडंही भान लोकांना राहिलं नाहीये! प्रशासनाकडून अशा ठिकाणी आता नियम घालून त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे! नाहीतर रोज अश्याच बातम्या येत आहेत…”
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून जी दुर्घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे… लोक वाहून गेलेत आणि संख्या आपल्याला माहीत नाहीये…
पूल ५० वर्षे जुना होता, त्याची दुरुस्ती करणं गरजेचं होतं!
सरकारने मंजुरी देऊनही काम सुरू झालं नाही!सरकारने जागं व्हावं!!! असे पूल आपल्याकडे अनेक ठिकाणी… pic.twitter.com/fXu0238VhG
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 16, 2025
इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळलेल्या ठिकाणी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी कास सायंकाळी (दि.15) भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते. इंदोरी गावाजवळील कुंडमळा इंद्रायणी नदीवरील पुल कोसळलेल्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली.
पोलो क्लबमधून संजय कपूर यांचा समोर आला शेवटचा फोटो, टीमने वाहिली भावनिक श्रद्धांजली
माध्यमांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमी व्यक्तींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली. घटनास्थळी एनडीआरएफ पथक, आपदा मित्र, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था आदी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. नागरिकांना वाचविण्यासाठी स्थानिकांनी मोठ्याप्रमाणात मदत केली आहे. घडलेल्या घटनेची चौकशी केली जाईल. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेबाबत शासन सतर्क असून यापुढे पर्यटकांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.