Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ आयटम साँग प्रदर्शित…

काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलचे ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे धमाल गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत असतानाच चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 16, 2025 | 06:52 PM
‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ आयटम साँग प्रदर्शित...

‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ आयटम साँग प्रदर्शित...

Follow Us
Follow Us:

‘वामा – लढाई सन्मानाची’ या आगामी मराठी चित्रपटातील धमाकेदार गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलचे ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे धमाल गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत असतानाच चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे संगीत, नृत्य, एनर्जी यामुळे हे गाणे प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे. स्नेहा गुप्ताची कातील अदा प्रेक्षकांना भुरळ पाडणारी असून सगळ्यांना थिरकायला लावणाऱ्या या गाण्याला कविता राम यांचा आवाज आहे. तर रिजू रॉय यांचे धमाल संगीत लाभलेल्या या गाण्याला मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. तसेच या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मुद्दासर खान यांनी केल्याने गाण्याला चारचांद लागले आहेत.

बॉलिवूडकरांनाही राजेश मापुस्करांच्या ‘एप्रिल- मे ९९’ चित्रपटाची भुरळ, ‘या’ सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

दिग्दर्शक अशोक आर. कोंडके म्हणतात, “ ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ या गाण्याला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो. आता प्रेक्षकांसाठी गुटूर गुटूर हे आयटम साँग घेऊन आलो आहोत. उत्तम संगीत, नृत्य, गाण्याचे बोल या सगळ्यांनेच गाण्याची रंगत वाढली असून हे गाणेही प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.”

निर्माते सुब्रहमण्यम के. म्हणतात, “ ‘वामा- लढाई सन्मानाची’ हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणार आहेच परंतु प्रेक्षकांचे मनोरंजनही करेल. आजच्या काळात मनोरंजनाबरोबरच उत्तम आशय देणेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि आम्ही हा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.’’

‘अशोक मा.मा.’ मालिकेत इंद्रनील कामतची एन्ट्री, भैरवीच्या आयुष्यात कोणते बदल होणार?

ओंकारेश्वरा प्रस्तुत व सुब्रमण्यम के. निर्मित ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Item song gutur gutur from the movie vama ladhai sanmanachi released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • marathi movie
  • News Song
  • viral Song

संबंधित बातम्या

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
2

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च
3

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता
4

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.