जान्हवी भावुक होत म्हणाली, “मी उद्धट बोलले, मोठ्यांचा अपमान केला. मला माहितीये की, लोकांचा राग शांत झालेला नाहीये. हा गेम आहे आणि हा बिग बॉसने दिलेला एक टास्क आहे. टास्क पूर्ण नाही केला, तर बिग बॉस चिडतात. मी प्रायश्चित म्हणून हा बझर वाजवते आणि हा खेळ सोडते.” यावेळी अभिनेत्रीला पु. ना. गाडगीळ अँड सन्सकडून १ लाख रुपयांचं गिफ्ट हँपर मिळालं आहे.














