फोटो सौजन्य सोशल मिडिया
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) च्या तपासणीत जिवंत झुरळं, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि अन्नसुरक्षेच्या नियमांची त्रुटी आढळल्याने सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मेसचा परवाना निलंबित करण्यात आला असून, मेस बंद करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी या आधी विद्यापिठातल्या प्रशासनाला तक्रार केली होती; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार जेवणात सेफ्टी पिन, आळ्या , जुरळ , सापडली होती. यावर विद्यापिठातल्या प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नाही. शेवटी विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी अन्न व औषध प्रशासना (FDA) कडे तक्रार केली. अन्न व औषध प्रशासना (FDA) कडे तक्रार केल्या नंतर मेस मधिल अस्वच्छता आणि सत्य परिस्थिती बाहेर आली.
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी तुकाराम मुंडेच्या यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली असून विद्यापिठाच्या मेस मध्ये पाण्याच्या गुणवत्ते पासून ते अन्न आणि सुरक्षतेचा प्रश्न समोर आला आहे. निष्काळजी पण करणाऱ्या मेसचा परवाना रंद्द करण्यात आला आहे. मेसच्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार आहे.
विद्यापिठाच्या मेस मध्ये अस्वच्छता व निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत होते. तर मेसच्या किचनमध्ये झुरळ, किडे आणि अंडी पडलेली आढळली. जेवणात व नाश्त्यामध्ये किडे, भाज्यांमध्ये प्लास्टिक, धातूची तार आणि केस अशा तक्रारी विद्यार्थिनींनी वारंवार केल्या होत्या.
तर शाकाहारी आणि मांसाहारी जेवण तयार करण्यासाठी स्वतंत्र जागा किंवा भांडी मेस मध्ये नव्हती. कचऱ्याचे डबे उघडे होते. अन्न बनवणारे कामगार हँडलूम/ग्लव्हज न वापरता काम करत असल्याचे तपासात समोर आले असून ‘मे. मराठा केटरर्स’ (आकाश मोहिते) यांच्यामार्फत ही मेस चालवली जाते.
MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस






