IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत, सौजन्य : एक्स
शाई होप (नाबाद 102 ) व शेरफन रदरफोर्ड (84) यांच्या तुफान खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेतील (IND vs WI) भारत विरोधातील दुसऱ्या टी-20 सामन्यात 6 विकेटने विजय मिळवला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्याआधी संजू सॅमसन (82)च्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजसमोर 5 बाद 250 धावांचे बलाढ्य आव्हान दिले होते, मात्र मयंक यादव वगळता भारताचा कोणताच गोलंदाज या सामन्यात चालला नाही. तसेच भारतीय संघाचं खराब क्षेत्ररक्षणही पराभवासाठी कारणीभूत ठरलं.
वेस्ट इंडिजने 250 धावांचा पाठलाग करत एकप्रकारे इतिहासच रचला आहे. टी-20 फॉरमेटमध्ये दुसऱ्यांदा अशाप्रकारे किमया करण्याचे श्रेय वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना जाते. त्यांनी सुरुवातीला विकेट पडूनही एक ओव्हर शिल्लक राखत विजय संपादन केले.
हा सामना खऱ्या अर्थानं संजू सॅमसनने गाजवला. टॉस जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला व सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा (20) ला झटपट बाद केले. प्लेऑफमध्येच पहिला विकट पडल्याचे प्रेशर असतानाही संजूने इशान किशनच्या (43)च्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी रचली. 4 गगनचुंबी षटकार व 9 चौकारांसह संजूने 82 धावा रचल्या. तो शंभरी गाठेल असे वाटत होते, मात्र हे वादळ शॅमर स्प्रिंगरने निकोलस पूरनकरवी झेलबाद करत शमवले.
अखेरच्या काळात कर्णधार श्रेयस अय्यर व तिलक वर्माने पाचव्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी रचत भारताच्या स्कोरबोर्डावर 200 पेक्षा जास्त धावा झळकवल्या. अय्यरने 3 चौकार व 3 षटकारांसह 40 धावा केल्या, तर तिलक हा 18 चेंडूंत 44 धावांवर नाबाद राहिला.
दुसरा डाव हा मयंक यादवच्या वेगवान गोलंदाजीने चमकला. पहिल्याच ओव्हरमध्ये मयंकने केमल पूरन (4) व शिमरोन हेटमायर यांचे सलग विकेट घेतले. त्याने हेटमायरला भोपळाही फोडू दिला नाही. इतकचं नव्हे तर प्लेऑफची अखेरची ओव्हरही कर्णधाराने मयंकला टाकायला दिली. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मयंकने खेळपट्टीवर जम बसवलेल्या रोवमन पोव्हेल (24)ला पॉव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान, वेस्ट इंडिजच्या मधल्या फळीने आक्रमक खेळी करत 8 व्या षटकातच 100 धावांचा पल्ला गाठला होता. यावेळी मैदानात भयान शांतताही पसरली होती.
किती छळाल त्या बिचाऱ्याला! आज Vaibhav Suryavanshi ला संधी देणार का? संघ व्यवस्थापन नक्की करतंय काय?
सामना भारताच्या पारड्यात पडतो, असे वाटत असतानाच शाई होप व शेरफन रदरफोर्ड (84) यांनी संधी मिळताच चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यास सुरुवात केली. होपने तर 23 चेंडूंत अर्धशतक झळकावत भारतीय चाहत्यांच्या ह्रदयाची धडकन वाढवली होती. तर त्यानंतर रदरफोर्डनेही 24 चेंडूंत अर्धशतक ठोकले. या काळात भारताचे क्षेत्ररक्षणही खराब राहिले. अनेक झेल सोडण्यात आले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी रचली. कुलदीपने रदरफोर्डचा काटा काढला. पण होपने वेस्ट इंडिजच्या विजयाचे होप कायम राखत अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहत संघाला विजय मिळवून दिले. त्याने 9 चौकार व 6 षटकार ठोकले.






