रितेश देशमुख दोन आठवडे कुठे होता ? अखेर केला खुलासा
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना खरंतर सर्वच बदलेलं पाहायला मिळालं आहे. अगदी होस्टपासून ते थीम आणि अनेककाही गोष्टींमध्ये प्रेक्षकांना फार ट्वीस्ट पाहायला मिळाला. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनपासून ते चौथ्या सीझनचं होस्टिंग दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले होते. पण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचं होस्टिंग निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते रितेश देशमुखने केला. ग्रँड फिनालेच्या दोन आठवडे आधी रितेश देशमुख ‘भाऊच्या धक्का’वर दिसला नव्हता. तो कोणत्या कारणामुळे नव्हता त्याचं कारण ग्रँड फिनालेच्या मंचावर सांगितले आहे.
हे देखील वाचा – दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांच्याविरोधात FIR दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
रितेशने ग्रँड प्रीमिअरला हजेरी लावली असून गेले दोन आठवडे आपण शोमध्ये का पोहचू शकलो नाही हे सांगताना रितेश देशमुख दिसला. रितेश म्हणाला की, “हा शो माझ्या खूप जवळचा आहे आणि मला सर्वांनी दोन आठवडे समजून घेतलं यासाठी खूप खूप आभारी आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतो. आता मी शूटिंग थांबवून खास आजच्या सोहळ्यासाठी इथे आलो आहे.”
माझे विदेशात शूटिंग सुरू असल्याने मला दोन आठवड्यांमध्ये येता आले नाही. वर्षभरापूर्वी केलेल्या एका कमिटमेंटसाठी मला दोन आठवडे शूटिंगवर जावं लागलं. एका क्रूजवर ही शूटिंग असल्याने ती टाळता येणार नव्हती. त्यामुळे आपण इथे उपस्थित राहू शकल्याचं त्याने सांगितलं.
बातमी अपडेट होत आहे…






