शिल्पा शिरोडकर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करत म्हणाली...
कोव्हिड १९ च्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. देशासह महाराष्ट्रामध्येही रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. मुंबई ठाण्यामध्येही अनेक रुग्णांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आली आहे. दररोज शेकडो लोकं कोरोना पॉझिटिव्ह होत असताना यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश होताना दिसत आहे. अलीकडेच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस १८ फेम शिल्पा शिरोडकर कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तिच्यानंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.
प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन; भावूक पोस्ट शेअर
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरनंतर आता अभिनेत्री निकिता दत्त सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तिच्यासोबत तिची आई देखील कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याविषयीचे वृत्त अभिनेत्रीने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिले आहे. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये निकिता दत्त म्हणते, “मला आणि माझ्या आईला कोरोना झाला आहे. हा फार काळ राहणार नाही अशी आशा आहे. छोट्या क्वारंटाईन ब्रेकनंतर पुन्हा भेटूच. सुरक्षित राहा.” अभिनेत्रीने आपली हेल्थ अपडेट देताना तिच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट शेअर केला आहे.
अखेर ठरलं! ‘बिग बॉस १९’ लवकरच सुरु होणार; सलमान खान होस्टिंग करणार की नाही? जाणून घ्या
सध्या निकिता आणि तिची आई होम क्वारंटाईन आहे. तिला कोरोनाचे सौम्य लक्षणं आहेत. परंतु ती बरी होईपर्यंत तिने तिचे काम आणि वर्क कमिटमेंट थांबवले आहेत. अभिनेत्रीला कोरोना झाल्याचे वृत्त कळताच चाहत्यांनी तिला हेल्थकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेत्री निकिता दत्ता शेवटची ‘ज्वेल थीफ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जो तिचा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. यामध्ये तिने सैफ अली खान आणि जयदीप अहलावतसोबत स्क्रिन शेअर केली आहे. तिच्या या चित्रपटातील अभिनयाचे कौतुक चाहते करीत आहेत.
शिल्पा शिरोडकर आता कोरोनातून बरी झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, “अखेर मी कोरोनातून बाहेर आले आहे. बरं वाटतंय. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद.” मनोरंजनविश्वात हळूहळू कोरोनाच्या केसेस आढळून येत असतानाच मुंबईत रुग्णांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वांना मास्क घालण्याचा आणि सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे.