प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन; भावूक पोस्ट शेअर
कप साँगमुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आलेल्या मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या लाडक्या आजीचं आज सकाळी निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अभिनेत्री मिथिला पालकर हिने स्वत: इन्स्टाग्रामवर आजीसोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही दु:खद बातमी शेअर केली आहे. मिथिलाने आजीच्या निधनाचे वृत्त शेअर करताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रिटींकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
अखेर ठरलं! ‘बिग बॉस १९’ लवकरच सुरु होणार; सलमान खान होस्टिंग करणार की नाही? जाणून घ्या
मिथिला पालकर हिने आजीसोबतचा फोटो पोस्ट करत तिने आपल्या भावना देखील शेअर केल्या आहेत. शेअर केलेल्या पोस्टमध्ये मिथिला म्हणते, “तिच्याशिवाय हे जग आहे याची मी कल्पना करु शकत नाही. मला थोडा वेळ लागेल. माझं सुरक्षाकवच, माझी शांतता आणि माझा आत्मा. रेस्ट वेल, मम्मा!” अशा शब्दात मिथिलाने आजीला श्रद्धांजली वाहिली आहे. मिथिलाने ही दुःखद बातमी शेअर करताच मिथिलाच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिच्या आजीला श्रद्धांजली वाहिली आहे.
मिथिलाच्या आयुष्यामध्ये आजी- आजोबांचं अढळ स्थान होतं. त्यांच्यासोबतचं तिचं नातं फार घट्ट आणि तितकंच प्रेमळ होतं. ती बालपणापासून त्यांच्यासोबतच दादरमध्ये राहत होती. २०२२ मध्ये मिथिलाच्या आजोबांचं निधन झालं. त्यानंतर आता काही वर्षांनंतर मिथिलाच्या आजीचं निधन झालं आहे. मिथिलाच्या आयुष्यातून आजी-आजोबांचं छत्र हरपल्याने तिला प्रचंड दुःख झालंय. मिथिलाचे मित्र-मैत्रिणी आणि चाहतेही या कठीण काळात तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून आधार देताना दिसत आहेत.
Cannes 2025: मोठ्या ब्लॅकहॅटमध्ये जान्हवीचा क्लासी अंदाज; तर, ऐश्वर्याच्या गाऊनने देखील वेधले लक्ष!
मिथिलाने शेअर केलेल्या पोस्टवर, श्रिया पिळगांवकर, जुई गडकरी, सायली संजीव, सारंग साठ्ये, अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, अभय देओल, गिरीजा ओक- गोडबोले, सुव्रत जोशी सह अशा अनेक मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींनी कमेंट केली आहे.