Bigg Boss 19 Start Date First Promo Salman Khan Host New Season Premiere July
टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय रिॲलिटी शोंपैकी एक असलेल्या ‘बिग बॉस’ शोच्या आगामी सीझनची चाहत्यावर्गात उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या याआधीचे सर्व सीझन गाजले. इतकंच नव्हे तर बिग बॉस ओटीटीची सुद्धा जोरदार चर्चा झाली होती. आता ‘बिग बॉस १९’ चं (Bigg Boss 19) बिगुल वाजलं आहे. शो सुरु असलेल्या चॅनेलबाबत मध्यंतरी कुजबुज कानावर आली होती. बनिजय एशिया (एंडेमोल शाइन इंडिया) हे निर्मिती करणार प्रॉडक्शन हाऊस कलर्स टीव्हीपासून वेगळं होणार आहे.
हे प्रॉडक्शन हाऊस बनिजय एशिया बर्याच वर्षांपासून बिग बॉस शोची निर्मिती करत आहे. या शोसंबंधित एक चांगली बातमी समोर आली आहे. पिंकविलाने शोबाबतचा मोठा खुलासा केला आहे. ‘बिग बॉस १९’ लवकरच सुरु होणार असून त्या शोची निर्मिती ‘एंडेमोल शाईन इंडिया’द्वारे केली जाणार आहे. अशातच चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे की, सलमान खान ‘बिग बॉस १९’ चं होस्टिंग करणार की नाही? आणि हा शो केव्हापासून सुरु होणार आहे? अखेर या प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना मिळालेली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या शोसाठी कमालीचे उत्सुक आहेत.
पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस १९’ लवकरच सुरु होणार असून त्या शोची निर्मिती ‘एंडेमोल शाईन इंडिया’करणार आहे. सर्वाधिक महत्वाचे वृत्त म्हणजे, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यंदाच्या ‘बिग बॉस १९’ चे सूत्रसंचालन करणार आहे. बर्याचदा ऐकायला मिळाले आहे की, सलमान खान हा शो सोडत आहे. परंतु त्याचे व्यस्त वेळापत्रक असूनही, ५९ वर्षीय भाईजान आपल्या चाहत्यांच्या प्रेमापोटी हा शो पुन्हा एकदा होस्ट करण्यास तयार झाला आहे. ‘बिग बॉस १९’ चा पहिला प्रोमो जूनच्या अखेरीस शूट केला जाईल. नवीन हंगामाचा प्रीमियर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात असणे अपेक्षित आहे. ‘बिग बॉस १९’ मध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार ? हे पाहणं औत्सुक्याचं होणार आहे.