Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘खालिद का शिवाजी’चित्रपटाची निवड, दिग्दर्शक राज मोरे यांच्या शिरपेचात मानचा तुरा

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांची पहिलीच मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ची कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मधील प्रतिष्ठित ‘मार्शे दु फिल्म’ या विभागासाठी निवड झाली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 19, 2025 | 03:32 PM
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘खालिद का शिवाजी’चित्रपटाची निवड, दिग्दर्शक राज मोरे यांच्या शिरपेचात मानचा तुरा
Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांची पहिलीच मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ची कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मधील प्रतिष्ठित ‘मार्शे दु फिल्म’ (Marché du Film) या विभागासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या फिल्म, थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यातर्फे अधिकृत निवड झालेला हा चित्रपट नुकताच जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात झळकला आहे. मायकेल थेवर आणि सुषमा गणवीर निर्मित, राज प्रीतम मोरे दिग्दर्शित ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात क्रिश मोरे याने खालिदची भूमिका साकारली असून सोबत प्रियदर्शन जाधव, भरत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलाश वाघमारे आणि स्नेहलता तागडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. केलाश वाघमारे लिखित या चित्रपटाचे संवाद राजकुमार तंगडे यांनी लिहिले आहेत. तर विजय मिश्रा चित्रपटाचे डिओपी आहेत.

‘सितारे जमीन पर’ थिएटरनंतर थेट युट्यूबवर प्रदर्शित होणार, आमिर खान आणणार PPV मॉडेल

‘खालिद का शिवाजी’ची निवड कान्स महोत्सवात झाली नसून इफ्फी इंडियन पॅनोरमा – एनडीएफसी फिल्म बाजार २०२४(गोवा), अजंठा – एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ – इंडिया फोकस स्पेशल स्क्रीनिंग, फ्रिप्रेसी इंडिया ग्रँड प्रिक्स अवॉर्ड २०२५ मध्ये नामांकनही मिळाले आहे. पाचवीत शिकणाऱ्या खालिद नावाच्या मुलाची ही कथा आहे. खालिदच्या मनात प्रश्न येतात,या प्रश्नांनी भरलेले त्याचे मन अखेर ‘शिवाजी महाराज’ शोधू लागते. या निरागस प्रश्नांमधून उगम पावणारी ही कथा केवळ एका मुलाची नाही, तर आजही अनेक मुलं, व्यक्ती, कुटुंबं ज्या भेदभावाशी झुंज देत आहेत, त्यांची आहे. खालिद एका सत्यशोधकाच्या भूमिकेत जातो आणि त्याच्या नजरेतून शिवाजी महाराजांना, त्यांच्या मूल्यांना, त्यांच्या समतेच्या विचारांना शोधतो. अशी या चित्रपटाची संकल्पना आहे.

१ जूनपासून ‘या’ दोन राज्यांमध्ये चित्रपटगृहे बंद होऊ शकतात, नेमकं कारण काय ?

राज मोरे यांना आधी ‘खिसा'(२०२०) या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त ‘बिच्छौल्या’ या शाहीर लुधियानवी यांच्या कवितेवर आधारित लघुपटासाठी ‘एमआयसीएफएफ २०२३’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मिळाला होता. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राज मोरे म्हणतात, “ही माझी पहिली फिचर फिल्म असून या चित्रपटावर मी २-३ वर्षं मेहनत घेतली आहे. माझ्या संपूर्ण टीमचे आणि निर्मात्यांचे मी आभार मानतो, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाल्यावर आता राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. ही आनंदाची भावना शब्दांत सांगता येणार नाही. लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येऊ.”

Web Title: Khalid ka shivaji marathi movie selected for cannes international film festival for screening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • marathi movie

संबंधित बातम्या

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी
1

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
2

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज
3

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण
4

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.