(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कोणताही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ४५ दिवसांनंतर तो ओटीटीवर रिलीज होतो. बॉलिवूड, टॉलिवूडसह प्रत्येक प्रादेषिक भाषेतील चित्रपट आपल्याला ओटीटीवर पाहायला मिळतात. येत्या २० जूनला आमिर खानचा ‘सितारे जमिन पर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. पण हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ओटीटीवर रिलीज न होता युट्यूबवर रिलीज करण्यात येणार आहे. पण हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर फ्री पाहायला मिळणार नाही. नेमकं युट्यूबवर कसा रिलीज होणार ? चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना किती पैसे मोजावे लागतील ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया…
१ जूनपासून ‘या’ दोन राज्यांमध्ये चित्रपटगृहे बंद होऊ शकतात, नेमकं कारण काय ?
आमिर खानचा ‘सितारे जमिन पर’ चित्रपट थिएटरनंतर युट्यूबवर रिलीज करण्यात येणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट PPV (Pay Per View) या तत्वावर पाहता येईल. याचाच अर्थ प्रेक्षकांना हा चित्रपट पैसे देऊन पाहता येईल. पहिल्यांदाच या मॉड्यूलचा वापर बॉलिवूडमध्ये केला जाणार आहे. हा प्रयोग खरंच यशस्वी होईल का ? यासाठी सर्वच उत्सुक आहेत. निर्मात्या अंशुलिका दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “PPV (Pay Per View) हे मॉडल ऑनलाईन बॉक्स ऑफिस प्रमाणेच आहे. मात्र अजूनही बॉलिवूडने अद्याप हे गांभीर्याने घेतलेलं नाही. थिएटरमध्ये १०० रुपये तिकीटामागे निर्मात्याला ३५ रुपये मिळतात. तेच PPV प्रमाणे निर्मात्याला ८० रुपये मिळतात.”
स्प्लिट्सव्हिला फेम अभिनेत्यावर इतकी वाईट वेळ कशी आली ? भीक मागतानाचा व्हिडिओ व्हायरल
निर्मात्या पुढे म्हणाल्या की, “पण अडचण ही आहे की, आपले फिल्ममेकर फक्त चित्रपट बनवण्यातच व्यग्र असतात. बिझनेस आणि मार्केटिंगचा विचारच करत नाहीत. निर्मात्याचं खरं काम केवळ सिनेमा बनवणं नाही. तर उलट त्या चित्रपटाचं सीईओ होणं असतं. छोट्या निर्मात्यांजवळ थिएटर रिलीजसाठी बजेट नसतं. म्हणून नाईलाजाने ते आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म्सला विकतात. पण तिथे त्यांना एकदाच पैसा मिळतो. जर ओटीटी प्लॅटफॉर्मकडून त्यांना ५० लाख मिळत असतील तर ते हाच रिस्क न घेण्याचा विचार करतात आणि पुढच्या सिनेमांच्या तयारीला लागतात. आमिरजवळ मार्केटिंगसाठी पैसा आणि तसा माइंडसेटही आहे. त्याला माहितीये की, आपण आपल्याच इंडस्ट्रीला नुकसान करत आहोत. जेव्हा आपण म्हणतो की, जर तुम्ही तिकीट खरेदी केले नाही तर तुम्ही चित्रपट तीन महिन्यांनंतर मोफत पाहू शकता. हे मॉडेल स्वतःला मारण्यासारखे आहे.”
युट्यूब स्ट्रॅटेजिस्ट आदित्य कुमार यांनी मात्र हा प्रयोग रिस्की असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, “युट्यूबचा हा प्रयोग क्रिएटर्ससाठीच फायद्याचा आहे. कारण त्यांचा प्रोडक्शनचा खर्च कमी होतो. एक व्हिडिओ बनवणं, ते प्रमोट करणं आणि त्यावर अॅड लावणं हा सगळा खर्च वाचतो. मात्र चित्रपटांसाठी हा प्रयोग रिस्की आहे. विशेषत: बॉलिवूड इंडस्ट्रीत हे धोक्याचं आहे जिथे सिनेमे ५० ते १०० कोटी कमावतात. अशात फक्त युट्यूब व्ह्यूजवरुन कमवणं जवळपास अशक्य आहे. आमिरच्या युट्यूब चॅनलवर २ लाखच सबस्क्रायबर्स आहेत जे त्याच्या ब्रँड व्हॅल्यूच्या तुलनेत खूप कमी आहे. लोकांना युट्यूबवर मोफत कंटेंट बघण्याची सवय आहे. पैसे भरुन युट्यूब पाहण्याची सवय त्यांना अद्याप लागलेली नाही. ”
शेख हसिना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?
आदित्यने पुढे सांगितलं की, “युट्यूबवर प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया, ट्रोलिंग, मीम्स आणि निगेटिव्हिटीचा मोठा परिणाम होतो. हे सर्व थिएटरमध्ये आणि ओटीटीवर फिल्टर केले जाते. परंतु यूट्यूबवर जनतेची प्रतिक्रिया सेन्सॉरशिपशिवाय येते. याचा परिणाम सेलिब्रिटींच्या इमेजवरही होतो. म्हणून, हा पाऊल एक मोठा धोका आहे. चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिक्रिया असतील तरच हे मॉडेल यशस्वी होईल असे मला वाटते.”