माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीचं नातं कसं होतं ? स्वत: माधुरीने केला खुलासा
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये श्रीदेवीचा आणि माधुरी दीक्षितचा समावेश होतो. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. दोघींनीही आपल्या नृत्य अदाकारीने फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या चाहत्यांना आपलेसे केले. सध्या माधुरी दीक्षित ‘भुल भुलैया ३’मुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीबद्दल खुलासा केला आहे.
हे देखील वाचा- नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची लग्नपत्रिका व्हायरल; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात
‘शोशा’ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षितने सांगितले की, “मी आणि श्रीदेवीने कायमच एकमेकींचा आदर केला आहे. एक कलाकार म्हणून मी त्यांचा आदर करते. पण आम्ही एकाही प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केले नव्हते. एका प्रोजेक्टमध्ये काम केलं, पण आमचे एकत्र सीन्स नव्हते. तिने एक अभिनेत्री म्हणून जे यश मिळवले त्याबद्दल मला तिचा प्रचंड आदर होता. श्रीदेवीने अनेक भाषांमध्ये कौतुकास्पद आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे.”
हे देखील वाचा- “पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या…” ‘पुष्पा २: द रूल’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
श्रीदेवीबद्दल बोलताना माधुरी दीक्षित पुढे म्हणाली, “श्रीदेवी एक यशस्वी अभिनेत्री होती. शिवाय ती कायमच आदरयुक्त आणि चांगल्या स्वभावाची होती. मी आणि श्रीदेवीने बोनी कपूर यांनी निर्मित केलेल्या ‘पुकार’ चित्रपटात काम केले आहे. तिने चित्रपटात कामही केलं होतं आणि चित्रपटाची निर्मितीही केली होती. शुटिंगवेळी आमचं फारसं बोलणं झालं नाही. दोघीही आपआपल्या कामात व्यस्त राहायचो. पुकारच्या शुटिंगवेळी माझं लग्न झालं होतं. त्यानंतर तो चित्रपट रिलीज झाला तेव्हा मी अमेरिकेला होते. त्यामुळे आमच्यात कधी बोलणं झालंच नाही. ”
” श्रीदेवी माझ्या आधी इंडस्ट्रीत आली होती. ती वयाच्या चौथ्या वर्षापासूनच चित्रपटांत काम करायची. तिने एक प्रसिद्ध अभिनेत्र होण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. त्यामुळे मला कायमच तिच्याबद्दल आदर वाटतो.” असं मुलाखतीच्या शेवटच्या भागात माधुरी म्हणाली.