अलिशान बंगला, महागडी कार अन् बरंच काही... नागा चैतन्य आणि सोभिताला सासरच्या मंडळींकडून करोडोंच्या भेटवस्तू; वाचा यादी
टॉलिवूड अभिनेता नागाचैतन्य आणि बॉलिवूड अभिनेत्री सोभिता धुलिपाला लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या कपलने गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यानंतर आता यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांची लग्नपत्रिका व्हायरल होत आहे. या पत्रिकेवर लग्नाची तारीख पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा- “पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या…” ‘पुष्पा २: द रूल’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
नागाचैतन्यचं हे दुसरं लग्न असून याआधी त्याने अभिनेत्री समंथाशी लग्नगाठ बांधली होती. २०२१ मध्ये समांथा आणि नागाचैतन्यचा घटस्फोट झाला होता. या दोघांचा संसार केवळ चार वर्षेच टिकले. घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसांनीच नागा चैतन्य सोभिताला डेट करू लागला. गेल्या महिन्यापासूनच त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आता त्यांच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विरल भयानीच्या इन्स्टाग्राम पेजवर नागा चैतन्यच्या आणि सोभिताच्या लग्नपत्रिकाचा फोटो समोर आला आहे.व्हायरल पत्रिकेनुसार, येत्या ४ डिसेंबर २०२४ रोजी नागाचैतन्य आणि सोभिता लग्नगाठ बांधणार आहे. लग्नपत्रिकेविषयी बोलायचे तर, सोभिता आणि नागा चैतन्य यांच्या लग्नपत्रिकेमध्ये दक्षिण भारतातील पारंपारिक गोष्टींचा समावेश पाहायला मिळाला आहे. वेगवेगळ्या शैलीतले मंदिरं, पारंपारिक दिवे, गायी, मंदिरातील घंटा यांचे फोटो पाहायला मिळत आहे. लिफाफाच्या पद्धतीने त्यांची लग्नाची निमंत्रणपत्रिका आहे.
नागा चैतन्य आणि सोभिताबद्दल आणि त्यांच्या परिवाराबद्दलही थोडक्यात माहिती दिलेली आहे. सोशल मीडियावर लग्नाच्या निमंत्रणाबरोबर वऱ्हाड्यांना लग्नानिमित्त गिफ्ट बास्केटही देण्यात आलं आहे. व्हायरल फोटोमध्ये, नागाचैतन्य आणि सोभिताकडून वऱ्हाड्यांना फूड पॅकेट्स, कपडे आणि फूलं अशा वस्तू त्या बास्केटमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. अद्याप अधिकृतरित्या लग्नाच्या ठिकाणाची माहिती मिळालेली नाही. चाहत्यांमध्ये या फेव्हरेट सेलिब्रिटीच्या लग्नाबद्दल खूप उत्सुकता आहे. नागा चैतन्य आणि सोभिताचा गुपचूप साखरपुडा ८ ऑगस्टला पार पडला.
हे देखील वाचा- निखळ सौंदर्याची खाण… निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वातावरणात राशी खन्नाच्या दिलखेचक अदा
त्यानंतर गेल्या महिन्यापासून, नागा चैतन्य आणि सोभिताच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. “पसुपू दंचतमनं” असं त्या समारंभाचं नाव होतं. “पसुपू दंचतमनं” हा लग्नाच्या आधीचा तेलुगू पारंपरिक समारंभ असतो. या कार्यक्रमामध्ये हळद, गहू आणि दगड यांचे एकत्रित पूजन केले जाते. या विधीत वधू हळद कुटत असते आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेत असते.