Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ “मी पुन्हा येणार” म्हणणारा माणूस पुन्हा आला… तो सुद्धा…” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी मराठमोळ्या गायकाची खास पोस्ट

सलील कुलकर्णी यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतचा १० वर्षांपूर्वीचा एका कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 06, 2024 | 02:32 PM
“ “मी पुन्हा येणार” म्हणणारा माणूस पुन्हा आला... तो सुद्धा...” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी मराठमोळ्या गायकाची खास पोस्ट

“ “मी पुन्हा येणार” म्हणणारा माणूस पुन्हा आला... तो सुद्धा...” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी मराठमोळ्या गायकाची खास पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुमताने महायुतीचा विजय झाला आणि अखेर काल सत्ता स्थापन झाली. ५ डिसेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गोपनियतेची शप्पथ दिली.

अनंत आणि राधिका ठरले मोस्ट स्टायलिश पीपल 2024 चे मानकरी, बियॉन्सेसह अनेक मोठ्या नावांचा यादीत समावेश!

या शप्पथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी.नड्डांसह आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सोबतच शप्पथविधीसाठी बॉलिवूडसह काही मराठी कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली होती. याशिवाय सोशल मीडियावरदेखील महायुती सरकारचे अभिनंदन करणाऱ्या विविध पोस्ट सेलिब्रिटींनी केल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शप्पथ घेतल्यानंतर मराठीतील सुप्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

 

सलील कुलकर्णी यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतचा १० वर्षांपूर्वीचा एका कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये सलील कुलकर्णी म्हणतात,

“माननीय देवेंद्रपंत… मनःपूर्वक अभिनंदन… दहा वर्षांपूर्वी… म्हणजेच २०१४ मध्ये परममित्र मुरलीअण्णांनी आयोजित केलेल्या कोथरूड महोत्सवात मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने झालेली ही देवेंद्रजी फडणवीस ह्यांची झालेली पहिली निवांत भेट… त्याचा हा फोटो !! गुरू जयमालाबाई आणि कीर्ती शिलेदार ह्यांच्या उपस्थितीत मिळालेला हा पुरस्कार… ही भेट देवेंद्रजीनाही अजून लक्षात आहे ही या माणसाची कमाल आहे…” “या माणसाकडे काहीतरी वेगळीच शांतता आहे… समाजमध्यामावर झालेली टीका… कुटुंबीयांची झालेली चेष्टा… या माणसाने ज्या पद्धतीने हाताळली… ही गोष्ट स्पृहणीय आहे. या फोटोत एकीकडे तेव्हाचे नगरसेवक आणि आत्ताचे केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीअण्णा मोहोळ आहेत आणि एकीकडे तेव्हाचे युवा प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत… दोघांनीही निष्ठा आणि कष्ट यातून मिळवलेलं यश अभिमानास्पद आहे… आणि त्यांच्याशी आपण सहज बोलू शकतो, आपलं म्हणणं मांडू शकतो अशी ही दोन माणसं…!! एखाद्याने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करावे तर असे… “मी पुन्हा येणार” म्हणणारा माणूस… पुन्हा आला… तो सुद्धा दिमाखात….!! सगळ्या साथीदारांना बरोबर घेऊन…!! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !! माननीय एकनाथराव शिंदे आणि अजितदादा ह्यांचेही मनापासून अभिनंदन !!”

“चैत्यभूमीच्या किनारी सागर गहिवरलेला, मानवतेचा महामानव आज…” महापरिनिर्वाण दिनी मराठमोळ्या अभिनेता महामानवासाठी खास कविता

Web Title: Maharashtra new cm devendra fadnavis old photo shared by dr saleel kulkarni he posted emotional note and congratulate him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • devendra fadanvis
  • saleel kulkarni

संबंधित बातम्या

Mumbai News: राज्यात बनणार आयकॉनिक शहरे; विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा वापर
1

Mumbai News: राज्यात बनणार आयकॉनिक शहरे; विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा वापर

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड
3

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
4

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.