(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि फार्मास्युटिकल दिग्गज वीरेन आणि शैला मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट हे दोघेही लग्नानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अनंत अंबानी आणि राधिका यांचा 2024 च्या न्यूयॉर्क टाइम मोस्ट स्टायलिश लोकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत अनेक बड्या व्यक्तींच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे.
अनंत – राधिका ठरले मोस्ट स्टायलिश पीपल
न्यूयॉर्क टाइम्सने राधिका आणि अनंतबद्दल लिहिले, ‘एक रेड कार्पेट, रिहाना, या दोघांच्या लग्नाआधीचे उत्सव आणि जलोष हे सर्व होते’. न्यूयॉर्क टाइम्सने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे खास क्षण आठवले. या यादीत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसोबतच अनेक मोठ्या कलाकारांच्या नावांचा देखील समावेश आहे. यात ज्युल्स लेब्रॉन, बेयॉन्से आणि ॲलेक्स कूपर यांसारख्या सेलिब्रिटींची नावे देखील आहे.
या स्टार्सच्या नावांचाही समावेश आहे
बियॉन्से, झेंडाया, ॲडेले, चार्ली यांसारख्या सेलिब्रिटींची नावे देण्यात आली आहेत. ज्युल्स लेब्रॉन, टिकटोकरचे नाव या यादीत समाविष्ट आहे. तसेच कॉल हर डॅडी पॉडकास्टमधून प्रसिद्ध झालेल्या ॲलेक्स कूपरचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. यांसारख्या अनेक मोठया सेलिब्रिटींची नवे देखील या यादीत आहे.
राधिका आणि अनंतचे लग्न २०२४ मध्येच झाले होते
अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंट यांचा विवाह याचवर्षी १२ जुलै २०२४ मध्ये झाला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये दोघांनी लग्न केले. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या दोघांच्या लग्नात अनेक बडे कलाकार जलोष करताना दिसले.
कोण म्हणतं अभिषेक- ऐश्वर्याचा घटस्फोट होणार?; हा घ्या पुरावा, पाहा Photo
लग्नात हे मोठे सेलिब्रिटी पोहोचले
अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हजेरी लावली, त्यांनी या जोडप्याला आशीर्वादही दिले. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि टोनी ब्लेअर, जॉन सीना, किम कार्दशियन, ख्लो कार्दशियन, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, निक जोनास, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर यांसारखे दिग्गज कलाकारही या लग्नाला उपस्थित होते. अनंत आणि राधिकाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. या जोडप्याने त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशनही परदेशात केले आहे.