Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांच्या कार्याची महती रुपेरी पडद्यावर येणार, ‘कवच’ चा मोशन पोस्टर रिलीज

सार्वजनिक जीवनात सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य असते आणि ते पोलिस यंत्रणा अत्यंत कार्यक्षमपणे पार पाडत असते. सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांचे 'कवच' बनून हे पोलिस बांधव दिवसरात्र कार्यरत असतात.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 15, 2024 | 06:42 PM
पोलिसांच्या कार्याची महती रुपेरी पडद्यावर येणार, ‘कवच’ चा मोशन पोस्टर रिलीज

पोलिसांच्या कार्याची महती रुपेरी पडद्यावर येणार, ‘कवच’ चा मोशन पोस्टर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

प्रजासत्ताकात कायदा आणि सुशासन यांचे अनन्यसाधारण महत्त्व असते आणि या व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा म्हणजे पोलिस प्रशासन. सार्वजनिक जीवनात सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य असते आणि ते पोलिस यंत्रणा अत्यंत कार्यक्षमपणे पार पाडीत असते. सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांचे ‘कवच’ बनून हे पोलिस बांधव दिवसरात्र कार्यरत असतात. त्यांच्या कार्याला, समर्पणाला, त्यागाला सलाम करणारा ‘कवच’ हा मराठी चित्रपट येऊ घातला आहे.

हे देखील वाचा- “ना पैसे, ना धंद्याची अक्कल..तरीही अनुभवांचा झाला ‘एलिझाबेथ एकादशी’”; संघर्षमय प्रवासावर निर्माती ‘मधुगंधा’ची भावनिक पोस्ट

नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी कटीबद्ध असणाऱ्या पोलिसांच्या कार्याची महती आगामी ‘कवच’ या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर लेखक -दिग्दर्शक घनशाम येडे मांडणार आहेत.‘फौजी’ चित्रपटाच्या यशानंतर आता ‘कवच’ या चित्रपटातून ते पोलिसांच आयुष्य व त्यांचे कार्य आपल्यासमोर मांडणार आहेत. मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘कवच’ या चित्रपटाचं दमदार मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

समाजाला पोलिसांचं ‘कवच’ नसतं तर समाजात अराजकता माजली असती…
माणूस माणसात राहिला नसता, जात, धर्म,पंत संस्कृतीची विल्हेवाट लागली असती…
तुमची कोणतीच गोष्ट तुमची राहिली नसती…
तुमचं अस्तित्व, इमानदारी स्वाभिमानाचं तर सोडा तुमचं जगणं असह्य झालं असतं…
लोकशाहीची हुकूमशाही झाली असती, जर समाजाला नसतं पोलिसांचं ‘कवच’….

असे धारदार सवांद प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये ऐकायला मिळतायेत. आपल्यासाठी कर्तव्यतत्पर असणाऱ्या पोलिसांच्या याच कार्याला ‘कवच’ या चित्रपटातून मानवंदना देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा- ‘कांगुआ’ पहिल्याच दिवशी सिनेमागृहात ढासळला, सूर्याच्या चित्रपटाने केली एवढीच कमाई!

शेतकरी कुटुंबातून आलेल्याआणि स्पॉटबॉय ते निर्माता-दिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास घनशाम येडे यांनी केला आहे. ‘बोला अलख निरंजन’, ‘फौजी’अशा वेगळ्या धाटणीच्या विषयांना त्यांचा दिग्दर्शकीय स्पर्श लाभला आहे. पोलिसांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केल्याचे घनशाम येडे सांगतात. २०२४ या वर्षाअखेरीस ‘कवच’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

Web Title: Maharashtra police based kavach marathi movie shooting start coming soon see movie motion poster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 06:42 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film

संबंधित बातम्या

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!
1

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News
2

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News

खांद्यावर तोफ आणि डोळ्यात उत्साह, स्वातंत्र्यदिनी दिसली ‘बॉर्डर २’ ची झलक; या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!
3

खांद्यावर तोफ आणि डोळ्यात उत्साह, स्वातंत्र्यदिनी दिसली ‘बॉर्डर २’ ची झलक; या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!

Shilpa Shetty – Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा आरोपांनी वेढलेले असताना भेट घेतली प्रेमानंद महाराजांची!
4

Shilpa Shetty – Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा आरोपांनी वेढलेले असताना भेट घेतली प्रेमानंद महाराजांची!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.