Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या कलाकारांच्या पडद्यामागे लेखणीची महत्त्वाची भूमिका असते. याच सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांच्या अपघाती निधनाने हास्यजत्रा टीमसह मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 17, 2026 | 05:02 PM
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सृजन टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सृजन टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

Follow Us
Follow Us:
  • ‘हास्यजत्रा’च्या लेखकाचे निधन
  • विजय कुमार राख काळाच्या पडद्याआड
  • हास्यजत्रा टीमवर शोककळा
 

पुणे : महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या पडद्यामागे विनोदाची उभारणी करणाऱ्या लेखणीतील एक महत्त्वाचा आवाज हरपला आहे. या कार्यक्रमाच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले. ऐन तारुण्यात झालेल्या त्यांच्या निधनाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसह मराठी मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

हास्यजत्रेच्या विनोदामागची लेखणी

‘हास्यजत्रा’च्या पडद्यावर कलाकारांच्या अभिनयातून विनोद प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. मात्र, त्यामागे व्यक्तिरेखा, प्रसंग, संवाद आणि विनोदी कल्पनांची बांधणी करणाऱ्या लेखकांची महत्त्वाची भूमिका असते. विजय कुमार राख हे याच सृजन प्रक्रियेचा भाग होते. ग्रामीण जीवनातील साध्या प्रसंगांमधील विनोद शोधणे आणि तो प्रभावी पद्धतीने लेखनातून मांडणे ही त्यांच्या लेखनाची विशेष ओळख होती. मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाशी जोडलेले अनेक बारकावे त्यांनी आपल्या लेखनातून टिपले. ग्रामीण भागातील बोली, तेथील माणसांचे स्वभाव, दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि सामान्य माणसाच्या जगण्यात दडलेला सहज विनोद यांचे निरीक्षण त्यांच्या लेखनात दिसून येत असे. त्यामुळे त्यांच्या लिखाणाला केवळ विनोदी संवादांची चौकट न राहता त्याला मातीशी जोडलेली सहजता आणि स्थानिक जीवनाचा स्पर्श मिळत होता.

हेही वाचा: Pune Crime: पुण्यात देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; तरुणींना हॉटेलमध्ये डांबून ठेवून…

ग्रामीण विनोदाला दिला वेगळा रंग

कलाकारांसाठी व्यक्तिरेखा उभी करताना त्या व्यक्तिरेखेची भाषा, तिची देहबोली, स्वभाव आणि प्रसंगानुरूप संवाद यांचा विचार करावा लागतो. या सगळ्या सृजन प्रक्रियेत लेखकांची भूमिका महत्त्वाची असते. विजय कुमार राख यांनी या प्रक्रियेत योगदान देताना ग्रामीण पार्श्वभूमीतील व्यक्तिरेखा आणि प्रसंगांना विनोदी अंगाने मांडण्याचे काम केले. त्यांच्या लेखनातून ग्रामीण जीवनातील अनेक बारकावे विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे विजय कुमार राख यांच्या अपघाती निधनाची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी विजय कुमार यांच्या लेखनगुणांचा आणि त्यांच्या स्वभावातील होतकरूपणाचा उल्लेख करत दुःख व्यक्त केले.

हेही वाचा: Accident News: गणेश विसर्जनाला गेले अन् काळाचा घाला; तलावातील खोल खड्ड्यात बुडून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू 

हास्यजत्रेतील लेखकाचे योगदान

‘विजय कुमार हे विनोदाची उत्तम जाण असणारे आणि ग्रामीण जीवनाचे बारकावे हेरणारे मराठवाड्यातील एक होतकरू लेखक होते. ऐन तारुण्यात त्यांचे जाणे हे कलाक्षेत्र, हास्यजत्रा टीम आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी मोठा धक्का आहे,’ असे सचिन गोस्वामी यांनी म्हटले.‘हास्यजत्रा टीम त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदनेत सहभागी आहे. विजय कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.कलाकारांच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या प्रसंगांची निर्मिती करणाऱ्या सृजन टीममधील विजय कुमार राख यांचे योगदान त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि ‘हास्यजत्रा’च्या चाहत्यांच्या स्मरणात राहणार आहे. त्यांच्या अकाली निधनाने या हास्यामागची एक महत्त्वाची लेखणी कायमची थांबली आहे.

Web Title: Maharashtrachi hasyajatra writer vijay kumar rakh passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Latest Marathi News
  • maharashtra news
  • maharashtrachi hasya jatra
  • Mharashtra

संबंधित बातम्या

Anant Nag: ‘KGF’मधील या दिग्गज अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; शबाना आझमीपासून रश्मिकापर्यंत गाजवल्या भूमिका
1

Anant Nag: ‘KGF’मधील या दिग्गज अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; शबाना आझमीपासून रश्मिकापर्यंत गाजवल्या भूमिका

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला
2

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन
3

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!
4

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.