Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shraddha Kapoor: लावणीच्या तालावर थिरकली श्रद्धा कपूर! कलाकारांसोबत फुगडी खेळतानाचा VIDEO चर्चेत

Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'ईठा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. मुंबईतील दादर येथील प्लाझा थिएटरमध्ये सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी श्रद्धाने पारंपरिक मराठमोळी साडी नेसून विंटेज गाडीतून हटके एन्ट्री केली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 30, 2026 | 06:25 PM
Shraddha Kapoor: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))

Shraddha Kapoor: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))

Follow Us
Follow Us:
  • श्रद्धा कपूरने लावणी कलाकारांसोबत खेळली फुगडी
  • ‘ईठा’च्या ट्रेलर लाँचला मराठमोळा अंदाज
  • विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत दिसणार श्रद्धा

बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या नवीन सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा आगामी सिनेमा ‘ईठा‘ लवकरच येतोय आणि त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलर लाँचसाठी एक भारी इव्हेंट मुंबईत करण्यात आला होता.आज दादरच्या प्लाझा थिएटरमध्ये ‘ईठा’चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी श्रद्धाने एकदम हटके एन्ट्री घेतली. तिने पारंपरिक मराठमोळी साडी नेसली होती आणि जुन्या काळातल्या विंटेज गाडीतून ती आली. Shraddha Kapoor:

दादर परिसरात तिच्या चाहत्यांनी तिला बघण्यासाठी गर्दी केली होती. श्रद्धाने हात हलवून सगळ्यांचं प्रेम स्वीकारलं.पण या इव्हेंटचा सगळ्यात भारी क्षण वेगळाच होता. तिथे श्रद्धाच्या स्वागतासाठी काही खऱ्याखुऱ्या लावणी कलावंत आल्या होत्या. त्यांच्यासोबत श्रद्धाने जे केलं त्याचा व्हिडीओ आता सगळीकडे व्हायरल होतोय.

श्रद्धाची फुगडी आणि तिचा नखरा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, लावणी कलावंतांनी श्रद्धाचं स्वागत केलं. श्रद्धाने पण तिच्या नेहमीच्या नखरेल अदेने सगळ्यांना प्रतिसाद दिला. तिथल्या एका कलावंताने तिला फुगडी घालायचा आग्रह केला. श्रद्धाने पण तो आग्रह मोडला नाही.तिने लगेच त्या कलावंताचा हात पकडला आणि भर स्टेजवर फुगडी घालायला सुरुवात केली.

Eetha Movie: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’मध्ये विठाबाईंच्या नवऱ्याची भूमिका साकारणार ‘हा’ बॉलिवूड अभिनेता, ‘मर्चंट’चा फर्स्ट लूक समोर

डोळ्यात डोळा घालून, पूर्ण एनर्जीने तिने फुगडी घातली. तिचा तो आनंद आणि उत्साह बघून तिथे असलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. खरं तर ती एक बॉलिवूडची मोठी स्टार आहे, पण तिने अजिबात मोठेपणा दाखवला नाही. अगदी जमिनीवरच्या कलावंतांसोबत मिसळून ती नाचली, हेच लोकांना जास्त आवडलं. हाच व्हिडीओ आता इंस्टाग्रामवर खूप फिरतोय.

‘ईठा’ सिनेमा नेमका कशावर आहे? कधी रिलीज होणार?

‘ईठा’ हा काही साधा सिनेमा नाही. यात श्रद्धा कपूर महाराष्ट्राच्या मोठ्या तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारते आहे. विठाबाईंचं नाव महाराष्ट्रात खूप मोठं आहे. त्यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे.

Eetha Trailer Out: ‘नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी’, श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

या सिनेमात श्रद्धा एकटी नाही. तिच्यासोबत मोहम्मद झिशान अय्युब, आपला लाडका सिद्धार्थ जाधव आणि अनंत जोशी हे कलाकार पण मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन ‘छावा’ फेम लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. निर्मिती मॅडॉक फिल्म्स आणि दिनेश विजन यांनी केली आहे.

सिनेमाचा ट्रेलर बघूनच लोकांना उत्सुकता लागली आहे. श्रद्धाने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. लावणी, बोलीभाषा सगळं तिने शिकून घेतलंय. ट्रेलरमध्ये ती हुबेहूब विठाबाईंसारखी दिसते.

हा सिनेमा 4 डिसेंबर 2026 रोजी थिएटरमध्ये येणार आहे. म्हणजे अजून वेळ आहे, पण आतापासूनच प्रमोशन जोरात सुरू झालं आहे. दादरमध्ये मराठी माणसांच्या मध्ये ट्रेलर लाँच करणं, ही पण एक चांगली आयडिया होती. आता प्रेक्षकांना फक्त सिनेमाची वाट बघायची आहे.

Web Title: Shraddha kapoor fugdi lavani artists eetha movie trailer launch rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

China News :चीनच्या रसायनांचा जगभर बोलबाला! घरातील रंगांपासून शॅम्पूपर्यंत प्रत्येक वस्तूत चिनी रसायनांचा शिरकाव
1

China News :चीनच्या रसायनांचा जगभर बोलबाला! घरातील रंगांपासून शॅम्पूपर्यंत प्रत्येक वस्तूत चिनी रसायनांचा शिरकाव

Vaishali Kadam Reveals: मुलीला घेऊन घर सोडण्याची वेळ आली, मुलगा मात्र शांतपणे पाहत राहिला; अरुण कदम यांच्या पत्नीचा खुलासा
2

Vaishali Kadam Reveals: मुलीला घेऊन घर सोडण्याची वेळ आली, मुलगा मात्र शांतपणे पाहत राहिला; अरुण कदम यांच्या पत्नीचा खुलासा

Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त
3

Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स
4

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.