Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: भोकरमध्ये बँक लुटण्याचा प्रयत्न; दरोडेखोर पळण्याआधीच पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News: जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. चादरी विक्रीचा बहाणा करून गावात फिरणाऱ्या तरुणांनी बँकेच्या कामकाजावर पाळत ठेवली होती.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 01, 2026 | 05:28 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
  • चादरी विक्रेत्यांच्या वेशात दरोडेखोरांची टेहळणी
  • गावकरी आणि पोलिसांच्या सतर्कतेने संशयित ताब्यात

जळगाव गावात चादरी विक्रीचा बहाणा करून फिरणारे तरुण प्रत्यक्षात बँक लुटण्याच्या तयारीत असल्याची कुणालाही पुसटशी कल्पना नव्हती. बँकेच्या कामकाजावर पाळत ठेवली, कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या सुट्टीची वेळ साधली आणि अचानक बंदुकीच्या धाकावर थेट स्टेट बँकेच्या स्ट्रांग रूमकडे मोर्चा वळवला! काही क्षणांतच बँकेत एकच गोंधळ उडाला. मात्र, दरोडा टाकून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या या सशस्त्र टोळीला गावकऱ्यांच्या सतर्कतेने मोठा धक्का बसला. Jalgaon News:

गावकऱ्यांनी पाठलाग करून तीन दरोडेखोरांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. जळगाव तालुक्यातील भोकर येथे शनिवारी दुपारी घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर दरोडा टाकण्यासाठी सात ते आठ जणांची टोळी काही वेळापासून टेहळणी करीत होती. गावात काही तरुण चादरी विक्रीसाठी फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले होते.

Jalgaon News: कचरा व्यवस्थापनासाठी पालकमंत्र्यांचा ‘ॲक्शन प्लॅन’

पळून जाण्याच्या प्रयत्नात गावकऱ्यांचा प्रतिकार!

बैंकेतील गोंधळाची माहिती बाहेर येताच गावक-यांना सशय आला. चादरी विक्रीच्या बहाण्याने गावात फिरणारे तरुणच या दरोड्यात सहभागी असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी दरोडेखोर आणि गावक-यांमध्ये झटापट झाली, काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तिघांना गावकऱ्यांनी पकडून ठेवले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलिसांची चौकशी सुरू; चार जण ताब्यात

“भोकर येथील स्टेट बैंक दरोडा प्रकरणात धरणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत धडाकेबाज कारवाई करत चावलखेडा रेल्वे बोगद्याजवळ दोन संशयितांना बेड्या ठोकल्या. शंकर रमेश जासक (वय ४२, रा. मुक्ताईनगर, सध्या जळगाव) आणि गजानन राजेंद्र पवार (वय ३२. स. नायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी नाकाबंदी करून दोघांना पकडले. त्यांच्याकडून संशयास्पद बेंगा जप्त करण्यात आल्या असून, त्यात दरोड्यातील रोकड किवा सोन्याचे दागिने असण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांच्या मदतीने यापूर्वी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुटीत साधला डाव

त्यामुळे त्याच्या हालचालींकडे कुणाचे विशेष लक्ष गेले नाही. मात्र, याच चादरी विक्रेत्यांच्या वेशातील तरुणाच्या मनात बैंक लुटण्याचा डाव शिजत असल्याचे नंतर उघड झाले.

Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य …

बँकेतील कर्मचारी जेवणाच्या सुट्टीसाठीची वेळ साधत टोळीने अचानक बैंकेत प्रवेश केला. हातात शस्त्रे आणि बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी बैंक कर्मचा-यांना एका जागी रोखून धरले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचा-यांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली, त्यानंतर दरोडेखोरांनी स्ट्रॉग रूममधील लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बिस्किटांसह दागिन्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. हाताला लागेल तेवढी रोकडही बॅगांमध्ये भरण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भोकर येथे दरोड्याचा प्रयत्न कुठे झाला?

    Ans: जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दरोड्याचा प्रयत्न झाला.

  • Que: दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश कसा केला?

    Ans: चादरी विक्रीचा बहाणा करून गावात फिरणाऱ्या टोळीने कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या सुट्टीची वेळ साधून बँकेत प्रवेश केला.

  • Que: दरोडेखोरांनी बँकेत काय करण्याचा प्रयत्न केला?

    Ans: त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून स्ट्राँग रूममधील सोन्याचे बिस्किट, दागिने आणि रोकड लुटण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Bhokar sbi bank robbery attempt jalgaon four suspects detained rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार; किती असेल तिकीट?
1

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार; किती असेल तिकीट?

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; अकाउंट लगेच चेक करा, सप्टेंबरचा हफ्ता झाला जमा
2

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; अकाउंट लगेच चेक करा, सप्टेंबरचा हफ्ता झाला जमा

Jalgaon News: कचरा व्यवस्थापनासाठी पालकमंत्र्यांचा ‘ॲक्शन प्लॅन’; मेहरूणमध्ये ट्रान्सफर स्टेशन सुरू
3

Jalgaon News: कचरा व्यवस्थापनासाठी पालकमंत्र्यांचा ‘ॲक्शन प्लॅन’; मेहरूणमध्ये ट्रान्सफर स्टेशन सुरू

Jalgaon News: वय फक्त आकडा! एरंडोलमध्ये २ हजार आजी-आजोबांची साक्षरता परीक्षा, ३० जण गैरहजर
4

Jalgaon News: वय फक्त आकडा! एरंडोलमध्ये २ हजार आजी-आजोबांची साक्षरता परीक्षा, ३० जण गैरहजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.