Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंट्या झाला बाबा; ‘होणार सून मी या घरची’ फेम रोहन गुजरने तीन महिन्यांनी शेअर केला पहिला फोटो

अभिनेता रोहन गुजर याने काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचे बेबी बंप फोटोशुट केलं होतं. ते फोटो त्याने सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. त्यानंतर आता तीन महिन्यांनी रोहनने त्याच्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 27, 2026 | 02:33 PM
पिंट्या झाला बाबा; ‘होणार सून मी या घरची’ फेम रोहन गुजरने तीन महिन्यांनी शेअर केला पहिला फोटो
Follow Us
Follow Us:
  • पिंट्या झाला बाबा;
  • अभिनेता रोहन गुजरने तीन महिन्यांनी शेअर केला पहिला फोटो
झी मराठीवरील गाजलेली म्हणजे मालिका म्हणजे होणार सून मी ह्या घरची. मालिका संपून कित्येक वर्ष झाली तरी आजही प्रत्येक प्रेक्षक या मालिकेवर भरभरुन प्रेम करतो. या मालिकेतील श्री आणि जान्हवी हे दोघेच नाही तर मालिकेतील इतर कलाकारांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. यातील एक व्यक्तीरेखा म्हणजे जान्हवीचा भाऊ पिंट्या. जसं श्री आणि जान्हवीसारखे जावई आणि सून असावी असं प्रत्येकाला वाटायचं तसंच भाऊ असावा तर पिंट्यासारखा असं देखील म्हटलं जायचं. याच पिंट्याची भूमिका साकारणारा अभिनेता रोहन गुजर याने काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचे बेबी बंप फोटोशुट केलं होतं. ते फोटो त्याने सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. त्यानंतर आता तीन महिन्यांनी रोहनने त्याच्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केला आहे.

Tula Pahata : अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून कमबॅक; तीन पिढ्यांची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर

गेल्या तीन महिन्यांपूर्वीच रोहनच्या घरी जुळ्या बाळांचं आगमन झालं. रोहनला एक गोड मुलगा आणि एक मुलगी अशी दोन जुळी बाळं झाली. तब्बल तीन महिन्यांनी अभिनेत्याने मुलांची नावं सोशल मीडियावर शेअर केली आहेत. रोहन लिहितो की, 3 Months / 2 Souls / 1 Family.

 

आद्या स्नेहल रोहन गुजर !
अद्वय स्नेहल रोहन गुजर !
असं कॅप्शन देत त्य़ाने दोन्ही मुलांच्या हाताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहनच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री नंदिता धुरी, स्वरदा ढिगळे, साक्षी गांधी तसंच अभिजीत केळकर, अमोल पाटील, पल्लवी पाटील आणि आकांक्षा गाडे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहनच्या आतापर्यंतच्या कामाबाबत सांगायचं तर त्याने, नाटक मालिका आणि सिनेमातून त्याने अभिनयाची छाप पाडली. होणार सून मी ह्या घरची मालिकेव्यतिरिक्त त्याने बन मस्का, एकाच ह्य़ा जन्मी जणू, लव्ह लग्न लोचा या मालिकांतून घराघरात पोहोचला. रोहन सध्या आमने सामने या नाटकातून देखील रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

“माझ्या मुलाला मासिक पाळीबद्दल…”, अभिनेत्री गिरिजा ओकचे संस्कार! तिच्या १२ वर्षांच्या लेकाचा किस्सा वाचून तुम्हीही कराल कौतुक

Web Title: Marathi actor rohan gujar share his twins photo and name share on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • marathi actor
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
1

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?
3

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
4

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.