Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ना पैसे, ना धंद्याची अक्कल..तरीही अनुभवांचा झाला ‘एलिझाबेथ एकादशी'”; संघर्षमय प्रवासावर निर्माती ‘मधुगंधा’ची भावनिक पोस्ट

अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका आणि लेखिका अशा सर्वच जबाबदाऱ्या अगदी लिलया पार पाडणाऱ्या मधुगंधाने सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 15, 2024 | 06:18 PM
"ना पैसे, ना धंद्याची अक्कल..तरीही अनुभवांचा झाला 'एलिझाबेथ एकादशी'"; संघर्षमय प्रवासावर फिल्म निर्माती 'मधुगंधा'ची भावनिक पोस्ट

"ना पैसे, ना धंद्याची अक्कल..तरीही अनुभवांचा झाला 'एलिझाबेथ एकादशी'"; संघर्षमय प्रवासावर फिल्म निर्माती 'मधुगंधा'ची भावनिक पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि व चि.सौ.का’, ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘वाळवी’ आणि ‘नाच गं घुमा’ यांसारख्या चित्रपटाचं नाव काढल्यावर आवर्जुन आपल्या नजरेसमोर परेश मोकाशी आणि त्याची पत्नी मधुगंधा कुलकर्णी येते. या चित्रपटांची लेखिका म्हणून अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीची इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख आहे. अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका आणि लेखिका अशा सर्वच जबाबदाऱ्या अगदी लिलया पार पाडणाऱ्या मधुगंधाने सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तिला निर्माती म्हणून इंडस्ट्रीमध्ये १० वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्त तिने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली.

हे देखील वाचा- ‘कांगुआ’ पहिल्याच दिवशी सिनेमागृहात ढासळला, सूर्याच्या चित्रपटाने केली एवढीच कमाई!

‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘मु.पो. बोंबिलवाडी’ या दोन चित्रपटांचं पोस्टर शेअर करत मधुगंधा कुलकर्णीने पोस्ट लिहिलीये की, “माझं बालपण पंढरपुरात गेलं. वडील खूप लहान असताना वारले. त्यांच्या मागे मुलांना शिकवून मोठं करण्याची धडपड माझी आई करत होती. तिचा आटापिटा कळत होता म्हणून मी आणि माझ्या भावाने बांगड्या विकण्याचा छोटा व्यवसाय केला…आणि त्या अनुभवाचा पुढे झाला एलिझाबेथ एकादशी… दहा वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवला… ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल… फक्त पॅशन होती… स्वतःचे पैसे घालून सिनेमा बनवला… परेशचे बाबा पाठीशी उभे राहिले… माझं गाव पंढरपूर मदतीला धावून आलं… शैलेश बडवे, श्रीकांत बडवे… खूप मदत झाली… आमची चित्रपटातली मुलांची फौज… सगळे चित्रपटाच्या पाठीशी उभे होते.”

 

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “चित्रपट बनवला पण पुढे काय करायचं माहित नव्हतं… त्यावेळी झी स्टुडिओच्या नावाचा खूप दबदबा होता… निखिल साने सिनेमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. उत्तम मार्केट केला… घरोघरी पोहोचवला. सगळे अवॉर्डज मिळाले. नॅशनल सुवर्ण कमळ… बॉक्स ऑफिसलाही धमाका… एलिझाबेथ माझ्यासाठी पहिला वाहिला निर्मितीचा अनुभव होता… सुखद झाला @saneness_ निखिल साने यांच्या सोबतीने, पाठिंब्याने! दहा वर्षांपूर्वी हे सगळं झालं…! पुढे खूप टक्केटोणपे, खूप चांगले वाईट अनुभव घेतले. चांगल्या अनुभवांनी प्रोहोत्सान दिलं तर वाईट अनुभवांनी शिक्षण! ५ सिनेमे बनवले, त्यातल्या तीन सिनेमांना नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि सर्व सिनेमांना रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम! त्याबळावरच पुन्हा एकदा मोठी झेप घेतोय आता ‘मुक्काम पोस्ट बोबिलवाडी’. वेगळा विषय आणि सुसाट मनोरंजन हा उद्देश. Loaded with laughter याचा प्रत्यय तो चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाला येईलच! १ जानेवारी २०२५ पासून आमचा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आपला होणार… हेतू प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन हाच आहे. रसिकहो आमच्या सगळ्या चित्रपटावर तुम्ही भरभरून प्रेम केलंत तसंच या चित्रपटाला ही तुमचं उदंड प्रेम आणि प्रतिसाद मिळो ही नटेश्वर चरणी प्रार्थना!”

हे देखील वाचा- ‘मंजुलिका’ने ‘बाजीराव’ला दिली टक्कर; ‘भूल भुलैया 3’ की ‘सिंघम अगेन’ कमाईच्या शर्यतीत कोण आहे पुढे?

मधुगंधा कुलकर्णी सध्या ‘मु.पो. बोंबिलवाडी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने निर्मिती केलेला हा चित्रपट येत्या १ जानेवारी २०२५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी परेश मोकाशी यांनी सांभाळली आहे. तर मधुगंधा कुलकर्णीने चित्रपटाची निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह आनंद इंगळे, मनमीत पेम, प्रणव रावराणे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, रितिका श्रोती, दिप्ती लेले अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Marathi actress writer madhugandha kulkarni shared instagram post see viral post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 06:18 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.