'आंबट शौकीन' कुटुंबाची रंजक गोष्ट, पाहायला मिळणार तीन मित्रांची धमाल गोष्ट; मोशन पोस्टर रिलीज
आजवर मराठी चित्रपटांमध्ये विविध विषय हे हाताळले गेले आहेत. आता लवकरच तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट येत्या १३ जूनला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या नावावरून कथानकाचा अंदाज बांधता येत असला तरी अनेक घडामोडींतून चित्रपटाची मनोरंजक कथा उलगडत जाते.
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या “मुंबई लोकल” ११ जुलैला येत आहे, मोशन पोस्टर रिलीज
तीन मित्रांच्या भोवती चित्रपटाची रंजक गोष्ट गुंफण्यात आली आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने पहावी अशी प्रत्येक पिढीची रंजक गोष्ट यातून आपल्याला अनुभवता येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तम कलाकारांची फौज आणि धमाल रंजक कथानक यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजन करणारा ठरेल यात शंका नाही. त्याशिवाय उत्तम गाण्यांचीही जोड या चित्रपटाला आहे. त्यामुळे आता “आंबट शौकीन” चित्रपट पाहण्यासाठी थोडाच काळ वाट पहावी लागणार आहे.
‘मी पाठीशी आहे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची अखेर वाट मोकळी, केव्हा होणार सिनेमा रिलीज
बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेन्मेंट प्रस्तुत “आंबट शौकीन” चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले आहे. निलेश राठी, प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, मोहित लखोटिया, अनघ भुतडा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अभिनेत्री पूजा सावंत, प्रार्थना बेहरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, गौतमी पाटील, मोनालिसा बागल, अमेय वाघ, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, देवेंद्र गाडकवाड, रमेश परदेशी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. साई पियुष यांनी संगीत दिग्दर्शन, संकेत धोटकर यांनी ध्वनी आरेखन तर मधुराम सोळंकी यांनी छायांकन केलं आहे.