Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकच गेम वाजवणार,आख्खा जिल्हा गाजवणार’,‘चौक’ सिनेमाचा टीझर रिलीज

देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित चौक या सिनेमाचा नुकताच टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच सिनेमा चर्चेचा विषय ठरत आहे.

  • By शिल्पा आपटे
Updated On: Apr 20, 2023 | 10:27 PM
‘एकच गेम वाजवणार,आख्खा जिल्हा गाजवणार’,‘चौक’ सिनेमाचा टीझर रिलीज
Follow Us
Close
Follow Us:

Marathi movie : टीझरची सुरूवातच भव्य गर्दीने होते. चौकाचं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळंच समीकरण असतं. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी मैत्री, वाद, चर्चा हे सगळे चौकातले अविभाज्य विषय असतात. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चौक चित्रपटाची (Chauk Marathi movie) निर्मितीमूल्य या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येतात.

प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतील. यामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद मिळणार आहे. टीझरमध्ये लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे संवादांनी.. सुरुवातीला उपेंद्र लिमये यांचा ‘वाघ आहे वाघ’ हा संवाद असो किंवा टीझरच्या शेवटी किरणचा ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’ हा संवाद असो.

चौकच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रविण तरडेंची खास शैली, रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई यांची वेगळी भूमिका, उपेंद्र लिमयेंचा रांगडा अभिनय, स्नेहल तरडे व संस्कृती बालगुडे यांच्या संवेदनशील भूमिका आपल्याला चौकमध्ये पाहायला मिळतील. तर, किरण गायकवाड चौकमध्ये तरूणाईचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय, चौकच्या निमित्ताने किरण प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसेल. तसेच वेगवेगळ्या बाजूंनी एकाच चौकात आलेले हे सर्व कलाकार आपल्यासमोर नक्की काय घेऊन येत आहेत ते सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळेल. टीझरमध्ये वाजणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे देखील हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

Web Title: Marathi movie chauk cinema teaser release nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2023 | 10:27 PM

Topics:  

  • pravin tarade

संबंधित बातम्या

“आता परीक्षा देवाची!” अध्यात्म vs विज्ञान या संघर्षाचा नवा अध्याय; Deool Band 2 लवकरच, चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
1

“आता परीक्षा देवाची!” अध्यात्म vs विज्ञान या संघर्षाचा नवा अध्याय; Deool Band 2 लवकरच, चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.