(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या लपंडाव या मालिकेत काम करताना दिसत आहे, या मालिकेमध्ये अभिनेत्री सरकार ही खलनायिकेची भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच रुपाली भोसले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. रुपालीने नुकत्याच खरेदी केलेल्या लक्झरी कारचा अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे रुपालीने काही दिवसांआधीच ही कार खरेदी केली होती ज्याची माहिती तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली.
”त्याचे अनेक मुलींसोबत संबंध…” ,’बिग बॉस १९’ फेम अभिषेक बजाजवर एक्स-पत्नीचे गंभीर आरोप!
आता याच नव्या कोऱ्या कारचा अपघात झाला आहे, ज्याची खूप वाईट अवस्था झाली असून त्याचे फोटो समोर आले आहेत. रुपाली भोसलेनं जानेवारी महिन्यात तिची नवी मर्सिडिज बेन्झ ही कार घरेदी केली होती. कार घेण्याच्या काही दिवस आधी तिने तिच्या नव्या घरात प्रवेश केला होता. आधी घर नंतर नवीन कार घेऊन रुपालीने तिचा आनंद सगळ्या चाहत्यांबरोबर शेअर केला. रुपालीया मर्सिडिज बेन्झ कारचा अपघात नक्की कसा झाला हे आपण आता जाणून घेणार आहोत.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कारच्या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. अपघातात कारचं बोनेट डॅमेज झाले आहे. रुपालीच्या कारचा अपघात कसा झाला याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही आहे. ‘ॲक्सिटेन्ट झाला, वाईट दिवस,’ असे कॅप्शन देऊन रुपालीने व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच हार्ट ब्रेकचं ईमोजी देखील ठेवला आहे.
Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरातून आवेज दरबारचा पत्ता कट, चाहत्यांनी मेकर्सवर केले आरोप
रुपालीने कार खरेदी केली तेव्हा ती प्रचंड आनंदात होती. तिने खास कॅप्शन लिहित कारचे फोटो शेअर केले होते. तिने पोस्टमध्ये कॅप्शन लिहिले, ‘एक दिवस मी तुझी मालकीण होईन यासाठी हे सर्व सुरू झालं. तुम्ही आयुष्यात फक्त स्वप्न पाहू नका. ती स्वप्न जगा, त्या स्वप्नांवर प्रेम करा आणि रिस्क घ्या. कितीही कठीण असलं तरी स्वतःला प्रॉमिस करा. तुमची स्वप्न सोडू नका. तुम्ही काय करू शकत नाही हे सांगू नका तर तुम्ही काय करू शकता हे सांगा. वेलकम बेबी, चल आता पुढे एकत्र प्रगती करत जाऊ.’ असे लिहून अभिनेत्रीने नवीन कारचे तिच्या आयुष्यात स्वागत केले.