(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस १९’ हा टीव्ही रिअॅलिटी शो सध्या जोरदार गाजतोय. घरातले स्पर्धक, त्यांचे वागणे आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य सातत्याने चर्चेत येत आहे.‘बिग बॉस १९’मधील स्पर्धक अभिषेक बजाज याचं वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे आणि त्याच्या एक्स-पत्नी आकांक्षा जिंदलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता आकांक्षाने एक खास मुलाखत देत त्यांच्या नात्याविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
आकांक्षानं विकी ललवाणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ”ते शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखायचे त्यानंतर सात वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी लग्न केलं. या लग्नाला आकांक्षाचे कुटुंबीय आधी तयार नव्हते. मात्र, तिच्या आनंदासाठी त्यांनी सहमती दिली.” परंतु,लग्नाच्या दीड वर्षानंतर या जोडप्यानं घटस्फोट घेतला.
असं काय झालं की, दीड वर्षातच तुमचं लग्न मोडलं, असं विचारल्यानंतर पुढे ती म्हणाली, “लग्नानंतर गोष्टी ३६० डिग्री बदलल्या, जे घडत होतं त्याचा स्वीकार करणं मला जमत नव्हतं. त्यानं विश्वासघात केला, त्याचं वागणं पाहून मला कळून चुकलेलं की, हा बदलणार नाहीये.” आकांक्षा म्हणाली, “त्यावेळी माझ्या कुटुंबानं मला खूप पाठिंबा दिला. त्याचे अनेक मुलींबरोबर संबंध होते. इंडस्ट्रीतील अनेकांनी मला त्याबद्दल सांगितलेलं.”
“आता मला सोशल मीडियाची भीती वाटते..”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली?
“आमच्या येणाऱ्या बाळासाठी…” अंकिता लोखंडे होणार आई? अकिंताची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘बिग बॉस १९’चा रंगतदार प्रवास दर आठवड्याला वेगळं वळण घेत आहे. कालच्या ‘वीकेंड का वॉर’ एपिसोडमध्ये सलमान खान आणि गौहर खान यांनी घरातील स्पर्धकांना चांगलंच सुनावलं. विशेषतः अमाल मलिक आणि अभिषेक बजाज या दोघांना सलमानने धारेवर धरले.सलमान म्हणाला, ‘तू कॅप्टन झालास, पण अशनूर सर्व निर्णय घेत होती. हे चुकीचं आहे.’ बिग बॉसच्या घरात अभिषेकची अशनूर सर्वात जवळची मैत्री आहे. त्यांच्या नात्यावर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. अशातच आता अभिनेत्याच्या एक्स पत्नीने त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.