Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिवीगाळ करणे…’, ‘आई-बाबा रिटायर होत आहेत’ फेम अभिनेत्याने अर्ध्यातूनच सोडली मालिका; आता सांगितले कारण

मराठी लोकप्रिय मालिका 'आई बाबा रिटायर होत आहेत' मधील मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्याने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. अभिनेत्याने ही मालिका का सोडली याचे कारण आता स्पष्ट केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 09, 2025 | 10:39 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘आई-बाबा रिटायर होत आहेत’ फेम अभिनेत्याने सोडली मालिका
  • अभिनेत्याने कारण केले उघड
  • वडील ॲडमिट असल्यामुळे सेटवर पोहचण्यास वेळ
मराठी मालिका इंडस्ट्रीमध्ये नेहमीच काम करणाऱ्या कलाकारांना वेळेवर मानधन न मिळणं, मानधन थकवने, सेटवर काळजी न घेणे, फसवणूक अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आणि यामुळे अनेक कलाकार अचानक मालिकाच निरोप घेतात आणि बाहेर पडतात. ‘पारू’ या मालिकेतील अभिनेता शंतनू गंगणेनं नुकताच याप्रकरणी आवाज उठवला होता. अशातच आता स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील ‘आई बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतील अभिनेता आदिश वैद्यने मालिका सोडल्याचे समजले आहे. आदिश मालिकेत दिसत नसल्याने त्याचे चाहते चिंता व्यक्त करू लागले. अखेर अभिनेत्याने याचे कारण स्पष्ट केले आहे. आदिश वैद्यचे वडील एका गंभीर आजाराला लढा देत आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच वडील ॲडमिट असताना अभिनेत्याला सेट सोडलास तर बघ अशा धमक्या, शिवीगाळ ते अंगावर धावून आल्याचे त्याने सांगितले.

Bigg Boss 19: ‘बिग बॉस १९’ मध्ये फरहाना भट्टची संपली कॅप्टन्सी, आता ‘हा’ स्पर्धक चालवणार घराची सत्ता

सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आदिश वैद्य म्हणाला, “एका अभिनेत्याचं आयुष्य अजिबात सोपं नसतं. फक्त अभिनय नव्हे तर अनेक गोष्टी एक नट म्हणून हँडल कराव्या लागतात. अभिनेत्यांना सहज टार्गेट केलं जातं. एखाद्या मालिकेतून माघार हे एका अभिनेत्यासाठी किंवा माझ्यासाठी सोपं अजिबात नाही. पण मला काही निर्णय घ्यावे लागले. कारण ते गरजेचे होते. कारण माझ्या आयुष्यात आता १० वर्षांच्या करिअरमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात एक अशी घटना घडली होती जी कधीच कोणासोबत घडू नये. माझे एक हिंदी आणि एक मराठी असे दोन शो सुरू होते. माझं माझ्या कामावर प्रचंड प्रेम आहे. १० वर्षात मी कष्टाने कमावलं आहे साग सगळं”.

आदिश पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्हाला ऑन सेट आरडाओरडा, शिव्यागाळ किंवा वर्बली फिजीकली जर कोणी अटॅक करत असेल तर ते तुमच्या सेल्फ रिस्पेक्टवर येतं. कारण ही गोष्ट मी एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून कधीच फेस केली नाही. माझ्या करिअरमध्ये मला खूप चांगले लोक भेटले आहेत. प्रेमाने काम करणारे लोक मला भेटले. मी दुसऱ्यांच्या स्वभावाची काळजी घेतो आणि स्वत:च्याही घेतो. दोन मालिका करत असल्याने कधी या सेटवर कधी त्या सेटवर जावं लागत होतं. सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत मी दोन्ही मालिकांसाठी शूट करत होतो. पण प्रोडक्शनमधल्या एका वैयक्तिने या गोष्टीचं प्रेशर घेतल्यामुळे त्याचे इगो क्लॅश माझ्यासोबत झाले. दोन्ही मालिका एकत्र करणार याच टर्मवर त्यांनी मला घेतलं होतं. दोन्ही सेटवर वेळेत पोहोचायला मी खूप कष्ट केले आहेत”.

‘हे तुझ्या कर्माचे फळ आहे…’, प्रेमानंद महाराजांच्या आशीर्वादासाठी पोहचला एल्विश यादव, दिले एक खास वचन

आदिश शेवटी म्हणाला, एखाद्याचं प्रेशर त्याला हँडल होत नाही आहे. म्हणून जर तो एखाद्या ॲक्टरला किंवा मला सांगणार असेल की मी सांगेल तोवर सेट सोडून जायचं नाही आणि गेलास तर मी बघेन काय करायचं वगैरे. तिथे मी हेच उत्तर दिलं होतं की माझे वडील लिलावतीमध्ये ॲडमिट होते. अजूनही त्यांचे उपचार सुरू आहेत. एका दिवशी तीन तासांसाठी मला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं. त्यामुळे एक दिवस आधी मी त्या माणसाला सांगितलं होतं की मला उद्या तीन तासांसाठी जावं लागेल. नंतर शिफ्ट एक्सटेंड करायलाही मी तयार होतो. पण आता मी बघतोच तू कसा जातो? असं त्या संबंधित वैयक्तिचं वागणं होतं. आपल्या इंडस्ट्रीत अंगावर धावून येणं हे कुठे घडतं? याप्रकरणी चॅनलसोबत सध्या माझं बोलणं असल्याचं, आदिश वैद्य म्हणाला आहे.

आदिश वैद्य हा मराठीमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी चित्रपट, मराठी मालिका आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘झिंगदी नॉट आईट’, ‘कुंकू टिकली आणि टॅटू’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘सवी की सवारी’, ‘पुष्पा इम्पॉसिबल’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘बॅरिस्टर बहू’ यांसारख्या मालिकांमध्ये काम करून त्याने प्रसिद्धी मिळवली आहे.

 

Web Title: Actor adish vaidya reveled why star pravah aai baba retire hot ahet serial left marathi television industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 10:39 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi actor
  • marathi serial news

संबंधित बातम्या

‘लग्नाचा शॉट’चा टिझर रिलीज, प्रियदर्शिनी-अभिजीत या नव्या जोडीचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
1

‘लग्नाचा शॉट’चा टिझर रिलीज, प्रियदर्शिनी-अभिजीत या नव्या जोडीचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवा अध्याय; श्रद्धा नेमकी कोणती? स्वामींनी दिला मोलाचा सल्ला
2

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवा अध्याय; श्रद्धा नेमकी कोणती? स्वामींनी दिला मोलाचा सल्ला

महायुद्धाची नांदी सुरू! भुलोकाचे रक्षण, महिषासुराचा अंत, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवा अध्याय
3

महायुद्धाची नांदी सुरू! भुलोकाचे रक्षण, महिषासुराचा अंत, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवा अध्याय

”तेव्हाच त्या आत्म्याला घरात..”, ‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये रहस्यमय वळण; गूढ घटनांनी वाढणार रहस्य
4

”तेव्हाच त्या आत्म्याला घरात..”, ‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये रहस्यमय वळण; गूढ घटनांनी वाढणार रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.