Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

F.I.R. NO. 469 Movie: अभिनेता किरण गायकवाडचे दिग्दर्शनात पदार्पण, ‘F.I.R. NO. 469’मधून मांडणार कॉमन मॅनची गोष्ट

F.I.R. NO. 469 Movie: अभिनेता किरण गायकवाड अभिनयक्षेत्रानंतर आता दिग्दर्शकीय क्षेत्रात पाऊल ठेवत असून ‘F.I.R. NO. 469’ हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट २२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 15, 2026 | 01:10 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

F.I.R. NO. 469 Movie : आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता किरण गायकवाड आता दिग्दर्शकीय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. किरण गायकवाड यांनी दिग्दर्शित केलेला ‘F.I.R. NO. 469’ हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं असून, पोस्टरमधूनच चित्रपटाच्या कथेविषयीची उत्सुकता वाढली आहे. ‘F.I.R. NO. 469’ हा चित्रपट २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

सत्ता, पैसा आणि गुन्ह्यांच्या भोवऱ्यात अडकलेल्या सामान्य माणसाची कथा

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि आनंदी एंटरटेनमेंट यांनी ‘F.I.R. NO. 469’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निलेश राठी, प्राची राऊत आणि सचिन अग्रवाल हे चित्रपटाचे निर्माते आहेत. अर्चना नरेश भुतडा सहनिर्मात्या असून त्र्यंबक डागा आणि मोहसीन खान सहयोगी निर्माते आहेत.

चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन किरण गायकवाड यांनी केलं आहे, तर योगेश कोळी यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.

‘F.I.R. NO. 469’मध्ये एका सर्वसामान्य नागरिकाची कथा मांडण्यात आली आहे. सत्ता, राजकारण, पैसा, गुन्हा, पोलिस प्रक्रिया आणि प्रशासन या सगळ्यांच्या गुंत्यात अडकलेल्या एका सामान्य माणसाचा प्रवास या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सस्पेन्स आणि थ्रिलरच्या माध्यमातून ही कथा उलगडत जाणार आहे.

पोस्टरमधून वाढली चित्रपटाची उत्सुकता

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका पोलिस स्टेशनमध्ये बाकड्यावर बसलेला एक सामान्य माणूस दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरची हतबलता आणि आजूबाजूचं वातावरण कथेत नेमकं काय घडणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण करतं. पोस्टरच्या मागील भिंतीवर दिसणारं ‘सत्यमेव जयते’ हे वाक्यही लक्ष वेधून घेत आहे.

पोस्टरवरूनच सामान्य माणूस आणि व्यवस्थेतील संघर्षाची झलक पाहायला मिळत असल्याने चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य

तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार

‘F.I.R. NO. 469’मध्ये मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. नचिकेत पूर्णपात्रे, प्रसाद ओक, अमृता धोंगडे, राहुल मगदूम, निखिल चव्हाण, हार्दिक जोशी, अंकिता लांडे, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, सुहास शिरसाट, योगेश शिरसाट, चेतन चावडा, अंजली जोगळेकर, अंकुश मांडेकर, मीरा सारंग आणि चेतन रायकर यांचा चित्रपटात समावेश आहे.

‘कॉमन मॅनची गोष्ट प्रेक्षकांना गुंतवून ठेवेल’

चित्रपटाबद्दल बोलताना किरण गायकवाड म्हणतात, “एका कॉमन मॅनची गोष्ट ‘F.I.R. NO. 469’ या चित्रपटात आहे. अत्यंत नाट्यमय घटना-घडामोडींमधून ही गोष्ट उलगडत जाते. समाजातील वेगवेगळे पदर त्यातून कळत जातात.”

ते पुढे सांगतात की, प्रेक्षक या कथेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतून राहतील अशा पद्धतीने चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे अभिनयासोबतच आता किरण गायकवाड यांचं दिग्दर्शनही प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

‘F.I.R. NO. 469’ हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट २२ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत

Web Title: F i r no 469 movie kiran gaikwad release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?
1

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

Prasad Oak Award:  प्रसाद ओक ठरला ‘कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून खास कौतुक
2

Prasad Oak Award: प्रसाद ओक ठरला ‘कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून खास कौतुक

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
3

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
4

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.