Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जिलबी’ नंतर स्वप्नील घेऊन येत आहे हास्याची अनोखी जत्रा; “चिकी चिकी बुबूम बुम” चित्रपटात अभिनेत्याची विनोदवीर भूमिका!

'जिलबी' या मराठी चित्रपटानंतर स्वप्नील जोशी प्रेक्षकांसाठी नवा चित्रपट घेऊन येत आहे. हास्याची अनोखी जत्रा "चिकी चिकी बुबूम बुम" चित्रपटाचा टीझर मधून स्वप्नील विनोदवीर भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 05, 2025 | 12:11 PM
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्षाची सुरुवात स्वप्नीलने गूढ आणि गोड ‘जिलबी’ या चित्रपटाच्यासोबत केली आणि आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हसवून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्वप्नीलने नव्या वर्षात चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटाची घोषणा केल्या नंतर आता तो या चित्रपटात एक विनोदवीर पात्र साकारणार असल्याचं समोर आले आहे. चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटाचा टीझर मध्ये स्वप्नील वैभवची भूमिका साकारणार असून हे पात्र आता चित्रपटगृहात काय धिंगाणा घालणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

स्वप्नील कायम वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करताना दिसतो आणि अश्यातच चित्रपटाच्या कथे सोबत तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका तेवढ्याच ताकदीने साकारून त्यांना योग्य तो न्याय देतो. भूमिका कुठली ही असो स्वप्नील ती भूमिका करण्याचं आव्हानं पेलून तिला किती उत्तम बनवता यईल याकडे लक्ष देऊन काम करतो. ‘जिलबी’ मधला रांगडा करारी लूक असलेला पोलीस अधिकारी ते ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मधला सगळ्यांचा खदखदून हसून मनोरंजन करणारा स्वप्नील प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारा स्वप्नील हा कोणत्याही भूमिकेत तितकाच लक्षवेधी ठरतो यात शंका नाही.

वीर पहारियाची खिल्ली उडवल्याबद्दल प्रसिद्ध विनोदी कलाकाराला मारहाण, ‘स्काय फोर्स’ अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया!

रियुनियन म्हणजे धमाल मस्ती. अशाच जबरदस्त बॅकबेंचर्स मित्रांच्या रियुनियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’,‘आगीतून फुफाट्यात’,‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींतून या बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख ही करून देण्यात आली आहे. या म्हणींची भानगड आणि त्यामागची गंमत हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात येणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल.

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे.

Pushpa 2: बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर घालतोय धुमाकूळ; रिलीजच्या अवघ्या चार दिवसांतच रचला इतिहास!

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रभाकर मोरे हे कलाकार दिसणार असून, यासोबतच नम्रता संभेराव,वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे हे कलाकारही चित्रपटात धमाल आणणार आहेत. जिलबी, चिकी चिकी बुबूम बुम नंतर स्वप्नील सुशीला – सुजीत, शुभचिंतक या चित्रपटात देखील अनोख्या भूमिकेत दिसणार आहे आणि याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Web Title: Actor swapnil joshi to play comedian role in the film chiki chiki booboom boom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Swapnil Joshi

संबंधित बातम्या

ऐश्वर्या रायपेक्षाही युनिक आहे सामंथा रूथ प्रभूची लग्नाची अंगठी; किंमत जाणून व्हाल चकित
1

ऐश्वर्या रायपेक्षाही युनिक आहे सामंथा रूथ प्रभूची लग्नाची अंगठी; किंमत जाणून व्हाल चकित

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका! ८० मराठी सिनेकलाकार ‘डोंबिवलीकर चषक’मध्ये भिडणार
2

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका! ८० मराठी सिनेकलाकार ‘डोंबिवलीकर चषक’मध्ये भिडणार

ऋषभची नक्कल रणवीरला पडली भारी! चाहत्यांची मागितली माफी, म्हणाला ‘मी नेहमीच परंपरा, संस्कृती…’
3

ऋषभची नक्कल रणवीरला पडली भारी! चाहत्यांची मागितली माफी, म्हणाला ‘मी नेहमीच परंपरा, संस्कृती…’

शरद पवारांचा नातू अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रिणीसोबत थाटला संसार; पाहा Photos
4

शरद पवारांचा नातू अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रिणीसोबत थाटला संसार; पाहा Photos

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.