
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस फेम अक्षय वाघमारेने चाहत्यांना आनंदची बातमी दिली आहे. अक्षय वाघमारे आता दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अक्षयची बायको आणि अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी दुसऱ्यांदा आई झाली आहे. कपलने नुकतेच योगिताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. चाहत्यांनी त्यांच्या पोस्टला कंमेंट करून अभिनंदन देखील केले.
धनश्रीशी घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल दुसऱ्या लग्नासाठी सज्ज? व्हायरल फोटोने उडवली खळबळ
अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी २०१९ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांचा कोरोनाकाळात लग्नसोहळा पार पडला होता. त्यावेळी असलेल्या सर्व नियमांचं पालन करुन त्यांनी दगडी चाळीत लग्न केलं होतं. त्यानंतर एका वर्षाने त्यांना मुलगी झाली. अर्ना असं तिचं नाव आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या घरी एका मुलीचं आगमण झालं आहे. आता लग्नाच्या सहा वर्षांनी अक्षय आणि योगिता दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. ‘मुलगी झाली हो’ असं कॅप्शन देत अक्षयने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अक्षय वाघमारे म्हणाला, “योगिताने आज सकाळी मुलीला जन्म दिला आहे. मला खरंच खूप आनंद झाला आहे. आज दुर्गाष्टमी आहे आणि लक्ष्मी घरी आली आहे. त्यामुळे आज घरी सण साजरा होणार आहे”. अक्षय पुढे म्हणाला,”मी, योगिता, मम्मी, डॅडी सर्वांनाच खूप आनंद झाला आहे. माझ्या आई-बाबांना खूप आनंद झाला आहे. देवाने दिलेली ही सुंदर भेट आहे. आम्हाला झालेला आनंद शब्दात न सांगता येणारा आहे”.
आधीच्या चार सीझनपेक्षाही जबरदस्त आहे ‘Stranger Things’ चा पाचवा भाग? जाणून घ्या Review
अक्षय वाघमारेच्या कामाबद्दल सांगायचं झाले तर, त्याने आतापर्यंत ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘ती फुलराणी’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘बस स्टॉप’, ‘दोस्तीगिरी’, ‘खुर्ची’ सारख्या मालिका आणि सिनेमात काम केलं आहे. तसेच अभिनेता बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये सहभागी झाला होता मात्र पहिल्याच आठवड्यात त्याला घराबाहेर जावे लागले. तर योगिता अरुण गवळीबद्दल सांगायचं झाल्यास, तिने राजकारणात एन्ट्री घेतली आहे. योगिता यंदाच्या MBC निवडणूका लढवणार असल्याची माहिती काही महिन्यांआधी समोर आली आहे.