(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
क्रिकेटपटू युझवेंद्र चहल हा त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. त्याने २०२० मध्ये डान्सर आणि कंटेंट क्रिएटर धनश्री वर्माशी लग्न केले. या दोघांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि त्यांनी २०२२ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता या जोडप्याचा घटस्फोट झाला आहे आणि २०२५ मध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेऊन विभक्त झाले आहेत. धनश्रीशी घटस्फोट झाल्यानंतर, युझवेंद्र चहल दुसऱ्या लग्नाचा विचार करत असल्याचे समोर आले आहे. त्याने दुसऱ्या लग्नाचे संकेत दिले आहेत.
युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या लग्नाची पोस्ट पाहून चाहते आनंदित झाले आहेत आणि लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर एका पोस्टवर कंमेंट करून आपल्या दुसऱ्या लग्नाची उत्सुकता दाखवून दिली आहे. तसेच आता त्याने नक्की काय कंमेंट केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
The Girlfriend लवकरच नेटफ्लिक्सवर! रश्मिका मंदानाच्या बहुचर्चित चित्रपटाची OTT रिलीज डेट जाहीर
युझवेंद्र पुन्हा लग्न करेल का?
युझवेंद्रने स्वतःचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, तो काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये खूप हँडसम दिसत आहे. त्याने फोटोंना कॅप्शन दिले आहे, “लग्न करण्यास तयार आहे, फक्त एका मुलीची गरज आहे.” युझवेंद्रच्या या पोस्टवर लोक आरजे महवशला टॅग करत आहेत. तसेच आता हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.
चाहत्यांनी केले मजेदार कमेंट्स
चाहलच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले, “युजी भाई, आरजेशी बोला.” दुसऱ्याने लिहिले, “युजी भाई, बँड तयार आहे.” दुसऱ्याने लिहिले, “मला मुलगी शोधावी का?” असे लिहून अनेक चाहत्यांनी या पोस्टला कंमेंट करून आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाचा अजय देवगणला दिलासा, Al निर्मित अश्लील व्हिडिओवर घातली बंदी; दिला मोठा आदेश
धनश्री आणि युजवेंद्रचे लग्न कधी झाले?
धनश्री वर्माने राईज अँड फॉल या रिॲलिटी शोमध्ये युजवेंद्र चहलशी तिचे लग्न कसे झाले हे सांगितले. ती म्हणाली, “त्यांचे प्रेम आणि अरेंज्ड मॅरेज होते. सुरुवातीला ते अरेंज्ड मॅरेज म्हणून सुरू झाले. पण तो डेटिंगशिवाय लग्न करू इच्छित नव्हता आणि मी लग्नाचा विचार करत नव्हतो. पण जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा त्याने मला पटवण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि मग मी होकार दिला. आमची एंगेजमेंट ऑगस्टमध्ये झाली होती आणि आम्ही डिसेंबरमध्ये लग्न केले.”






